शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या मावळ लोकसभा अध्यक्षपदी कृष्णा वसंत साबळे यांची नियुक्ती

मावळ मराठा न्युज -मुंबई,प्रतिनिधी, शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे तसेच मावळ लोकसभा महीला आघाडी अध्यक्षा भारती ताई चांदणे यांच्या सोबतीला मावळ लोकसभा अध्यक्षपदी श्री कृष्णा साबळे यांचे नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणाहून जाहीर केली .नवनियुक्त मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे यांनी सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग दिव्यांग बांधव, तृतीयपंथी भगिनी,माता भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना व विनंती दाखले यांनी करून पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page