लोणावळ्यात भाजपच्या वतीने नारी शक्ती वंदन मॅरॊथान,रन फॉर नेशन आणि रन फॉर मोदीच्या घोषनेने चित्रा वाघ यांनी केले उदघाटन

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,रन फॉर नेशन आणि रन फॉर मोदी कार्यक्रमाला विद्यार्थी, विद्यार्थिनी,महिला जेष्ठ नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी रन फॉर नेशन या स्पर्धेचे शिटी वाजवून उदघाट्न केले. या कार्यक्रमात लकी ड्रॉ मार्फत आणि प्रथम द्वितीय अशी आकर्षक अशी ट्रॉफी आणि मावळचे भाजप चे निवडणूक अधिकारी रवींद्र भेगडे यांच्या वतीने विजेत्यांना सायकली बक्षीस देण्यात आल्या.यावेळी लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नारी शक्ती वंदन मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण चित्रा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी सरचिटणीस कविता हिंगे, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पूनम चौधरी, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे लोणावळा शहर अध्यक्ष अरुण लाड, यांच्या सोबत भाजपचे सर्व आघाड्यांचे अध्यक्ष, आजीमाजी पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मॅरेथॉन स्पर्धेच्या खुल्या गटात पूजा केदारी यांनी पहिला तर पांडुरंग बोऱ्हाडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. मुलांच्या गटात लोणावळा महाविद्यालयाचा अमोल मरगळे व व्ही.पी. एस. चा रितेश आडकर यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकवला.मुलींच्या गटात आदिवासी समाजातून आलेली व संपूर्ण मॅरेथॉन अनवाणी धावलेली सोनू सांबरे हिने पहिला तर सुमित्रा चौहान हिने द्वितीय क्रमांक पटकावला. सोनू सांबरे हिचे चित्रा वाघ यांनी विशेष कौतुक केले. या लकी ड्रॉ मध्ये अबोली बोडके, रितेश आडकर आणि गौरव मोहिते यांना विजेतेपद मिळाले.

जेष्ठ नागरिक संघ,लोणावळा यांनी केली मॅरॉथान नंतर परिसराची स्वछता शेकडो स्पर्धाकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. स्पर्धा संपल्यावर प्लास्टिकच्या बाटल्या इतर कचरा उचलून जेष्ठ नागरिक संघाने आपली वडीलकीच्या आणि सामाजिक बांधिलकी ने आपले लोणावळा शहर स्वच्छतेत गेली पाच सहा वर्षे अग्रेसर राहिले आहे ते जेष्ठानी स्वच्छ केले.त्याबद्दल त्यांचे मावळ मराठा न्यूज परिवाराकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page