आळंदीच्या श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्था अध्यक्षपदी बाळासाहेब टकले

मावळ मराठा न्यूज :-आळंदी (प्रतिनिधी) श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्था, आळंदी महाराष्ट्र या अध्यात्मिक संस्थेच्या अध्यक्षपदी दिंडी क्रमांक ८३ माऊलींच्या रथामागेचे दिंडीप्रमुख ह.भ.प. बाळासाहेब टकले यांची विश्वस्त मंडळ बैठकीत निवड करण्यात आली. श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्थेच्या झालेल्या बैठकीत रिक्त अध्यक्ष पदाकरिता दिंडीप्रमुख ह.भ.प.बाळासाहेब टकले यांच्या नावाची सुचना ज्येष्ठत्वाचा अंतिम निर्णय व सर्व विश्वस्तांनी दिलेल्या अधिकाराने संस्थेचे जेष्ठ माजी अध्यक्ष विलासराव भालेराव यांनी मांडली. तसेच अध्यक्ष पदाच्या सुचनेला संस्थेचे माजी सचिव व विद्यमान विश्वस्त ग्रंथमित्र रमेशराव सुतार यांनी बिनशर्त अनुमोदन दिले. अध्यक्ष निवड सभेला उपस्थित १५ संपुर्ण कार्यकारी विश्वस्तांपैकी संस्थेचे ज्येष्ठ माजी अध्यक्ष व विदयमान विश्वस्त ह.भ.प. ज्ञानेश्वर बबनराव सुतार, निवड सभा अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष ह.भ.प. दत्तात्रय सुतार, संस्थेचे सचिव ह.भ.प.गणपतराव बारवकर, संस्थेचे सहसचिव ह.भ.प.संतोषशेठ भागवत, संस्थेचे खजिनदार ह.भ.प. दगडू काळे, जेष्ठ विश्वस्त ह.भ.प. सुधाताई चव्हाण, विश्वस्त ह.भ.प. मनोहर कदम, विश्वस्त ह.भ.प. चंद्रकांतशेठ कदम, विश्वस्त ह.भ.प.ताराबाई वसंत कदम, विश्वस्त ह.भ.प.माधवराव पांचाळ, विश्वस्त ह.भ.प. दिलीप सुतार या १४ विश्वस्तांनी ठरावाच्या बाजुने सहमती दर्शविली. एकूण १४ विरूद्ध १ या प्रचंड बहुमताने अध्यक्ष पद निवडीवर शिक्कामोर्तब झाले. स्विकृत जेष्ठ विश्वस्त व संस्था माजी सचिव ह.भ.प. रखमाजी जगन्नाथ जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन आणि उपस्थित विश्वस्तांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना गोड पेढा भरवुन त्यांचे अभिनंदन केले आणि आम्ही सर्व विश्वस्त मंडळ आपणास संस्था कार्यात सहकार्य करू हा विश्वास दिला. प्रसंगी स्विकृत विश्वस्त ह.भ.प.संतोष महाराज ताजने यांनी ही नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले. नवनिर्वाचित अध्यक्ष ह.भ.प.दिंडीप्रमुख बाळासाहेब टकले यांनी आभार मनोगतात आपल्या सर्वांच्या सहकार्याने मला मिळालेल्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. विलासराव भालेराव ह.भ.प. ज्ञानेश्वर सुतार ग्रंथमित्र रमेश सुतार ह.भ.प. दत्तात्रय सुतार मा. अध्यक्ष, विद्यमान विश्वस्त मा. अध्यक्ष, विद्यमान विश्वस्त मा. सचिव, विद्यमान विश्वस्त विद्यमान उपाध्यक्ष श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्था, आळंदी देवाची, पुणे महाराष्ट्र

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page