पाटण,बोरज,भाजे,पिंपळोली भागातील महिलांचा एल्गार,सुनील शेळके यांच्या घोषणानी दुमदूमला परिसर

मावळ मराठा न्युज -लोणावळा, येऊन येऊन येणार कोण… आमच्या लाडक्या भावाशिवाय आहेच कोण… सुनील आण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! महिला भगिनींच्या या घोषणांनी आज पाटण, बोरज, भाजे, पिंपळोली, मळवली, पाथरगाव, घरकुल, ताजे, औंढे, औंढोली, कुसगाव, ओळकाईवाडी, कुसगाव वाडी, हा सर्व परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता. आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद यात्रेला आज बुधवारी सकाळी पाथरगाव येथून सुरुवात झाली. प्रत्येक गावामध्ये आमदार सुनील शेळके यांच्या स्वागतासाठी महिला भगिनी मोठ्या संख्येने औक्षण करण्यासाठी तासनतास अक्षरशः उभ्या होत्या. मावळ तालुक्याच्या विकासासाठी मागील पाच वर्ष दिवस रात्र झटणाऱ्या या आमच्या भावासाठी आम्ही पूर्ण ताकतीने उभे राहणार असल्याचा संकल्प या महिला भगिनींनी व्यक्त केला. आमदार सुनील शेळके यांनी केवळ मावळ तालुक्यामधील विकास कामांना प्राधान्य दिले नाही तर या तालुक्यामधील महिला व मुली यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध व्यवसायिक उपक्रम राबवत महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याचे काम केले आहे. मावळ तालुक्यासाठी दिवस रात्र झटणाऱ्या या आमच्या भावाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर या मावळ तालुक्यातील काही स्वार्थी लोकांनी एकटे पाडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र या तालुक्यातील तमाम माता, भगिनी आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे काम करणार असल्याच्या भावना या गावांमध्ये महिला व्यक्त करत होत्या. आमदार सुनील शेळके यांच्यावर प्रेम करणारे शेकडो तरुण कार्यकर्ते वडीलधारी मंडळी हे देखील त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, मागील पाच वर्ष सातत्याने प्रयत्न करत मावळ तालुक्यातील प्रत्येक गावाला विकास निधी देण्याचे काम केले आहे. केवळ रस्ते, पाणी व लाईट म्हणजे विकास नाही तर मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून उपलब्ध करून देत प्रत्येक तरुणाच्या, प्रत्येक महिलेच्या व प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळून देण्यासाठी अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प या मावळ तालुक्यामध्ये आणले आहेत. त्या प्रकल्पांना पूर्णत्वास नेऊन या मावळ तालुक्याला सर्वांगीण दृष्ट्या विकसित करण्याचा माझा संकल्प आहे. माझ्या मावळ तालुक्यातील तरुणांना केवळ काम करणारे कामगार नाही तर इतरांच्या हाताला काम देणारे उद्योजक मला बनवायचे आहेत. मागील पंचवार्षिक काळात विकास कामे करताना या तालुक्यातील माझ्या माता भगिनी, तरुण सहकारी यांना विविध ठिकाणी देवदर्शनाचा लाभ देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर विरोधकांकडून टिका होऊ लागली आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या या तालुक्यातील वारकरी माता-पिता व बंधू-भगिनींसाठी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले त्यावर देखील विरोधक टीका करत आहेत. मागील दहा वर्षांमध्ये या मावळ तालुक्याच्या विकासासाठी काय केले, पुढील पाच वर्षात काय करणार आहात याची कसलीही माहिती या तालुक्यातील जनतेला न देता केवळ सुनील शेळके यांच्यावर टीका करणे हाच विरोधकांचा अजेंडा असल्याचा टोला आमदार सुनील शेळके यांनी लगावला आहे. मी आज सर्व माझ्या माता-भगिनींना सांगू इच्छितो येत्या काळामध्ये माझ्या तालुक्यातील प्रत्येक माता-भगिनीला मी विमानाचा प्रवास घडवणार आहे. महिलांसाठी महायुती सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे कायम ठेवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. माझ्या शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या माध्यमातून विज बिल माफ करण्यात आले आहे. ती सवलत पुढील पाच वर्षे कायम ठेवण्याचे काम मला करायचे आहे. या मावळ तालुक्यात एक समृद्ध असे पर्यटन उभे करत तालुक्याचा कायापालट करायचा आहे असे त्यांनी सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page