लोणावळ्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा,आधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नप्रक्रिया उद्योग प्रशिक्षणा ला महिलांचा प्रचंड प्रतिसाद

मावळ मराठा न्युज:- लोणावळा, महाराष्ट्र शासन -कृषी विभाग “कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)पुणे व आधार फाउंडेशन लोणावळा यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा अंतर्गत महिलांसाठी अन्नप्रक्रिया उद्योग प्रशिक्षण या कार्यक्रमाचे लोणावळा येथे नुकतेच दिनांक ५ मार्च रोजी आयोजन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी वडगाव मावळ दत्तात्रय पडवळ यांनी या योजनेची कार्यपद्धती शासनाचा अन्नप्रक्रिया उद्योगाचा उद्देश व या योजनेस असलेला वाव या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले व या योजनेमध्ये महिलांनी वैयक्तिक व गटाच्या माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन केले. उपक्रम व्यवस्थापक कृषी आयुक्तालय पुणेचे दिनेश राठोड यांनी अन्न प्रक्रिया उद्योगांची वेगवेगळे विषयांचे प्रशिक्षण याबाबत माहिती दिली. रिसोर्स पर्सन पुणे,तेजोमय घाडगे यांनी अन्नप्रक्रिया उद्योग व प्रकल्प ऑनलाईन प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बँक ऑफ महाराष्ट्र लोणावळाचे बँक मॅनेजर, राकेश कुमार यांनी अन्न प्रक्रिया उद्योगासाठी बँक कर्ज प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. पंचायत समिती मावळ, तालुका अभियान व्यवस्थापक (ग्रामीण) चे गायकवाड व लोणावळा नगरपरिषद अभियान व्यवस्थापक( शहर) दिलीप गायकवाड यांनी बचत गट तयार करण्यासाठी कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. आधार फाउंडेशन लोणावळाचे सचिव पांडुरंग तिखे यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीमती. मनीषा दगडखैर कृषी सहाय्यक लोणावळा व सौ.अनुजा वाडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजक आधार फाउंडेशन लोणावळाचे अध्यक्ष प्रकाश पाठारे यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी श्री वसंत मोरे,मंडळ कृषी अधिकारी खडकाळा,संताजी जाधव कृषी अधिकारी पंचायत समिती मावळ, ज्ञानेश्वर बुचडे कृषी पर्यवेक्षक खडकाळा, राहुल घोगरे, बी टी एम तालुका कृषी अधिकारी मावळ, नितीन बांगर कृषी सहाय्यक हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणास शहरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.कृषी सहाय्यक श्रीमती. मनीषा दगडखैर व प्रकाश भाऊ पाठारे अध्यक्ष आधार फाउंडेशन संस्था यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page