लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सो.लि. संस्थेतर्फे लोणावळ्यात जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा सन्मान

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही संस्था २०१९ पासून नाकोडा कॉम्प्लेक्स लोणावळा येथे कार्यरत असून आतापर्यंत या संस्थेच्या एकूण २१३ शाखा भारतात कार्यरत आहेत. जनहितास अनेक उपक्रम या संस्थेच्या अंतर्गत राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लोणावळा शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान केला गेला यात सौ. सुषमाताई कडू – संस्थापिका नेतृत्व महिला बचत गट,भांगरवाडी, सौ. सिंधुताई जाधव – कवयित्री व प्रकाशिका, सौ. नेत्राताई हारपुडे- वकील, सौ.भाग्यश्री कुलकर्णी- वकील, त्याशिवाय बँकेच्या खातेदार सौ. कांता सातपुते, सौ. अर्चना कामठे, सौ. कुसून महामुनी, सौ.जान्हवी कुटे, सौ.अनघा खोंडगे, सौ .सुमन डाके यांचा सत्कार करण्यात आला. सौ.दामिनी थरकुडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व त्यांची ओळख करून दिली. शाखाधिकारी श्री. सूर्यकांत लोंढे यांनी सर्व महिलांचा लेखिका मीना प्रभू यांचे सुंदर प्रवासवर्णने असलेली पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली तसेच संस्थेच्या उपक्रमाबद्दल अवगत करण्यात आले. सौ. सुषमाताई कडू व सौ. सिंधुताई जाधव यांनी संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. शेवटी सौ.समृद्धी निकुडे यांनी सर्वांचे आभार मानले. स्री शक्तीचा जागर हा या संस्थेच्या वाटचालीचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page