क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्यांची जयंती दिव्यांग शाळेत जाऊन केली साजरी


मावळ मराठा न्यूज,खोपोली:- आम्ही खोपोली कर आमचं ठरलय संघटनेच्या वतीने ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्यांची जयंती डॉक्टर कुंदा आणि सुभाष महादेव दोंदे ह्यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट ह्यांच्या खोपोली मधील पहिल्या मतिमंद,दिव्यांग शाळेत जाऊन केली साजरी. शाळेत उपस्थित असलेले मतिमंद, दिव्यांग मुले, मुली ह्यांच्या बरोबर अश्या प्रकारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करताना त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर, देहबोली वर एक वेगळाच आनंद आम्हा सर्वांना बघायला मिळाला. महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्यांच्या वेशात असलेल्या निरागस कुं. शितल विपट ही मुलगी ह्या कार्यक्रमाचे खास आकर्षण बनली. मुख्याध्यापिका सौ.स्मिता अमर निळकंठ ह्यांनी शाळेबद्दल व डॉ. कुंदा मॅडम ह्यांनी ही शाळा चालू करण्यापासून ते आता पर्यंत स्वतः भाड्याच्या घरात राहून ह्या मुलांसाठी आपले संपूर्ण आयुष्य, पैसा खर्च केला व इतरही शाळा चालू ठेवण्यासाठिच्या आताच्या समस्या ह्याबद्दल माहिती दिली. शाळेत असलेल्या मतिमंद मुलांच्या कश्या प्रकारे सांभाळ, शिक्षण व ह्याच बरोबर त्यांच्या कलागुनाना वाव देण्याचा त्यांचा छंद जोपासण्यासाठी कश्या प्रकारे मेहनत घेतली जाते हे ही सांगितले शाहिद शफी शेख ह्यांनी सुरवातीला शाळेसाठी अश्या प्रकारच्या मुला मुलींची घरी जाऊन त्यांच्या आई वडील ह्यांना समजाऊन त्यांना एक विश्वास देऊन शाळेत येण्यासाठी पराऋत्र केले. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी समाजातील प्रवाहात आन्यासाठी व इतर गोष्टींसाठी त्यांच्यावर कश्या प्रकारे मेहनत घेऊन त्यांना एक वेगळे आयुष्य जगण्याची उमेद दीलि गेली ह्याबद्दल माहिती दिली.श्री. ज्ञानेश्वर गायकवाड ह्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्यांची थोडक्यात माहिती.स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते, स्वातंत्र्यापासून स्त्रीला परावलंबी, शिक्षणा पासून वंचित आणि परतंत्र ठेवले जात होते त्या काळात सातारा जिल्हातील शिरवळपासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील याच्या घरी ३ जानेवारी १८३१ रोजी जन्म झाला. पुढे मात्र सावित्रीबाईना महान समाज सुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणाच्या कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री – शिक्षण व दलित्धारक कार्य करणाऱ्या ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टी कोणामुळे स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली. सावित्रीबाईनी ज्योतीबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. सावित्रीबाई शाळेत मुलीना शिकवायला जाऊ लागल्या की अतिकर्मठ लोकं त्यांच्यावर दगड, शेण, चिखल वैगरे फेकीत. पण सावित्रीबाईना या सर्व छळाला शांतपणे तोंड देवून मुलीना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले .अनाथांना आश्रय मिळावा ह्या त्यांच्या कार्यक्षेत्र मुळे त्यांच्या श्रद्धेने प्रभावी झाली. सामजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळेच १८७६ – ७७ मधल्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाने १० मार्च १८९७ मध्ये बळी ठरल्या. समजातल्या दिन : दलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपदनाऱ्या सावित्रीबाई खऱ्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचरणी म्हणून शोभल्या. त्यांच्या थोर सामजिक कार्या विषयाची कृतध्नता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालीकादिन” म्हणून साजरा केला जातो. आम्ही खोपोली कर आमचं ठरलंय संघटनेच्या माध्यमातून शाळेसाठी मुले बनवत असलेल्या पणत्या, उदबत्ती, बुके व इतर सामान ठेवण्यासाठी त्यांना पाहिजे असलेली मांडणी तसेच सर्वांसाठी नाष्टा ह्याची सोय केली हा सर्व खर्च श्री. संतोष फुलोरिया ह्यांच्या माध्यमातून करण्यात आला त्या बद्दल उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मांडण्यात आले.कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ.स्मिता निळकंठ, शिक्षिका – सुषमा पाटील, शिक्षक – प्रशांत हडप, आया – अविना बोभाटे तसेच शाळेतील मुले मुली याच बरोबर आम्ही खोपोली कर आमचं ठरलय संघटनेचे श्री. ज्ञानेश्वर गायकवाड, श्री. मोहन केदार, श्री. प्रदीप मोरे, श्री. गणेश ठाकरे, श्री. इंद्रसेन घोडके, कु. मुस्तफा शेख, श्री. निलेश मोडवे, श्री. शाहिद शफी शेख, श्री. इरफान शेख, कु. अक्षय सकपाळ, श्री. अविनाश देशमुख, श्री. अभिजीत पाटील श्री. महेश काजळे उपस्थित होते.




