*लायन्स क्लब ऑफ लोनावला चे लायन साधना देवेंद्र टटीया यांना उत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कार*

मावळ मराठा न्यूज – पुणे,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लायन्स आंतरराष्ट्रीय डिस्ट्रिक्ट 3234- डी 2 यांच्या वतीने रावेत ब्लू वॉटर बँक्वेट हॉल पुणे.येथील भव्य अशा सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. तसेच लायन्स क्लब ऑफ लोनावळा क्लब ला बेस्ट लायंस क्लब अवाड्र्स मिळाला. दिनांक 26/07/2026 या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल एम जे एफ ला.राजेशजी अग्रवाल, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभय शास्त्री मा.पोलीस उपायुक्त जाधव मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी लायन्स मेंबर्स, आदी मान्यवत्यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी सर्वच मान्यवरांनीयांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की अशा समाजसेवकांची समाजाला गरज असून कोणत्याही क्षेत्रात ते अत्यंत सचोटीने तत्परतेने आणि सातत्याने काम करत असतात तसेच त्यांच्या कार्यात विश्वासाहर्ता असल्याने सर्व सामान्य गरजूसाठी ही बाब फायदेमंद असून कार्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी.अशा प्रकारच्या सन्मानामुळे सामाजिक क्षेत्रात सेवा करण्यासाठी प्रेरणा व बळ मिळत असते, तसेच यामुळे सामाजिक जबाबदारी व उत्साह देखील वाढला आहे यापुढे सामाजिक क्षेत्रात जास्तीत जास्त सचोटीने काम करण्याचा प्रयत्न राहील हा सन्मान सेवेमुळे मिळाल्याने हा सन्मान दिल्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद देत आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page