समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास – सौ. स्नेहल सिताराम जाधव

मावळ मराठा न्युज नाव -सौ. स्नेहल सिताराम जाधवपत्ता राजारामपुरी २ री गल्ली, पहिला मजला, प्लॅट नं. ४, पंकज अपार्टमेंट, व्ही.टी. पाटील हॉल पाठीमागे, कोल्हापूर.समाजसेवेची आवड, वाचन-लेखनाची प्रेरणा आणि जनहितासाठी कार्य करण्याची जिद्द या गुणांच्या बळावर सौ. स्नेहल सिताराम जाधव यांनी सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शासकीय सेवेत प्रामाणिकपणे कार्य करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.सौ.स्नेहल जाधव यांनी पाटबंधारे विभाग, कोल्हापूर येथे दि. २९/०१/१९८५ ते ३०/०६/२०१८ पर्यंत शासकीय सेवा बजावली असून त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. सेवाकाळात कर्तव्यनिष्ठा आणि जबाबदारीने काम करत त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात योगदान दिले. निवृत्तीनंतरही त्यांनी आपला वेळ समाजसेवेसाठी समर्पित केला आहे.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत जनकल्याण सामाजिक सेवा संस्था, कोल्हापूर यांच्यावतीने त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हा सन्मान त्यांच्या समाजहिताच्या कार्याचा आणि सेवाभावाचा गौरव आहे.नुकताच त्यांना भारत मंदिर सभागृह येथे राज्यस्तरीय कविसंमेलनात विविध मान्यवारांचा सन्मान करण्यात आला यात सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सौ.स्नेहल जाधव यांना सन्मानीत करण्यात आले.दि. ९/०९/२००९ पासून त्या जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर पर्ल या संस्थेशी जोडलेल्या असून त्यांनी संस्थेत सेक्रेटरी, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. तसेच त्या जायंट्स वेलफेअर फाऊंडेशन २ क मध्ये माजी फेडरेशन ऑफिसर म्हणून कार्यरत राहिल्या आहेत.सन २०२० पासून त्या जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थ या संस्थेमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. आरोग्य शिबिरे आयोजित करणे, वृद्धाश्रमांना भेटी देऊन मदत करणे, दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करणे, गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करणे, तसेच “लेक वाचवा” अभियानासारख्या जनजागृतीपर उपक्रमांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.वाचन, लेखन आणि पर्यटन हे त्यांचे आवडीचे विषय असून या माध्यमातूनही त्या समाजातील विविध विषय समजून घेण्याचा आणि सकारात्मक विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतात.सौ. स्नेहल जाधव यांचा सेवाभावी स्वभाव, सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ यामुळे त्यांना समाजात आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. शासकीय सेवेनंतरही त्यांनी समाजसेवेचा वसा कायम ठेवत अनेक गरजू व्यक्तींना मदतीचा हात दिला आहे.समाजाच्या विविध घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सौ. स्नेहल सिताराम जाधव यांचा समाजसेवेचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस मावळ मराठा न्युज परिवाराच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page