प्रा.श्री धनराज पाटील यांना सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार

मावळ मराठा न्यूज़ लोणावला, प्रा. धनराज पाटील यांचा प्राचार्य डॉ.डी.एन.सदानंशिव (मा. सदस्यविधी आयोग भारत सरकार) यांच्या हस्ते सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा सिद्धार्थ महाविद्यालय फोर्ट, मुंबई येथील कार्यक्रमात देण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी डी.एन. सदानंशिव (सदस्यविधी आयोग भारत सरकार ),मा. योगीराज बागुल,मा. अनिल म्हमाने (अध्यक्ष निर्मिती विचारवंत), मा.डॉ.अशोक सूनकरी (प्राचार्य सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई )व छाया पाटील (अध्यक्ष भगवा फाउंडेशन मुंबई )इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रा. श्री धनराज पाटील सर हे लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे मराठी विषयात २५ वर्षापासून अध्यापन करत आहेत .श्री.पाटील यांना शिक्षण क्षेत्रात समाज बांधिलकी मानून ज्ञानदान करत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या, ग्रामीण भागातून श्रम शिबिरातून व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, आरोग्य विषयक जनजागृती, गुणवंत गरजू अभ्यासू विद्यार्थ्यांना दात्यामार्फत प्रवेश फी उपलब्ध करून देणे इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप विचारवंतांची वैचारिक पुस्तके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल प्रा पाटील यांचे लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्रजी नय्यर, सचिव दत्तात्रय पाळेकर, विश्वस्त ॲड.नीलिमा खिरे , विश्वस्त दत्तात्रय येवले, उद्योजक नंदकुमार वाळंज, सीडीसी मेंबर विशाल पाडाळे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.विलास पाटील ,समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page