वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर यांच्या वतीने जुना पुणे-मुंबई महामार्गाने जाणाऱ्या अवजड वाहनास बंदी करण्यासंदर्भात पोलिस स्टेशनला निवेदन

मावळ मराठा न्युज:- लोणावळा,दिनांक ३०/५/२०२४ रोजी लोणावळा, खंडाळा राष्ट्रीय महामार्ग ४ म्हणजे जुना पुणे मुंबई महामार्गाने जाणाऱ्या अवजड वाहनास बंदी करण्या संदर्भात लोणावळा पोलिस स्टेशन ला निवेदन देण्यात आले.या वेळी वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर अध्यक्ष श्री.लोकेश भडकवाड, वंचित बहुजन आघाडी महासचिव लोणावळा शहर,श्री.विशाल कांबळे श्री.संजय कांबळे.वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर कार्यध्यक्ष,श्री.अब्दुल शेख उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर वंचित बहुजन आघाडी संपर्कप्रमुख लोणावळा शहर श्री.सोनू कदम,श्री अभिजित धांडोरे,आघाडी लोणावळा शहर संघटक.महिला कार्यकारणी मध्ये वंचित बहुजन आघाडी, लोणावळा शहर अध्यक्ष संगीता अवचर, उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,रत्नप्रभा देशपांडे ,उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,आशालता वाघमारे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page