पटनाट्यातून गणेश मूर्तीदान व संकलन जनजागृतीचा दिला गणेश भक्तांना संदेश







मावळ मराठा न्युज -पिंपळे गुरव (आण्णा जोगदंड ) दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थांच्या वतीने पिंपळे गुरव येथील नदी घाटावर गणपती मूर्तीदान करा!असा संदेश पथनाट्यातून देऊन गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी जनजागृती करण्यात आली.दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक,मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, प्रकाश घोरपडे, बालकलाकार काव्या घोरपडे, क्रांती घोरपडे यांनी पथनाट्यात सहभाग घेतला. पिं. चिं. महानगरपालिकेने पालिका क्षेत्रात नदी घाटावर पाण्याचे हौद तयार केले आहेत. त्याच ठिकाणी गणेश विसर्जन सर्वांनी करावे हा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला.यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले,गणेश मूर्तीदान केल्याने अथवा हौदात विसर्जन केल्याने नदी प्रदूषण निश्चित कमी होईल. काळानुरूप माणसाने बदलले पाहिजे.! निर्माल्य कुंडीत टाकावे म्हणून पटनाट्य केले. आतापर्यंत पिंपळेगुरव च्या घाटावर एकूण1500 मूर्तीचे संकलन करण्यात आले, यामध्ये शाडूच्या 400 तर पीओपीच्या 1100 मूर्तीचे संकलन करण्यात आले यामध्ये पालिका आरोग्य विभाग, दिलासा संस्था,मानवी हक्क संरक्षण आणि जागृती त्याचबरोबर बेसिक टीम यांनीही मूर्ती संकलनामध्ये सहभाग नोंदवला,उपस्थित नागरिकांना पर्यावरणाची शपथ दिली.यावेळी ड प्रभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी राजु साबळे ,मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड,गुणवंत कामगार प्रकाश घोरपडे, मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे,आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार,बेसिक टिमचे झोनल प्रमुख सुखदेव लोखंडे,सागर पाटील,शिवाजी निम्हण, वार्ड इन्चार्ज विजय पेंडे,दीपक चौरे,काव्या घोरपडे, क्रांती घोरपडे उपस्थित होते. श्री गणेशाची विधिवत पूजा,आरती करून मुर्तिदान करण्यात आले.



