नवी दिल्ली येथे होणाऱ्या नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय AGM बैठकीसाठी पुणे जिल्ह्यातून दोन सदस्यांची निवड






मावळ मराठा न्युज -पुणे, दि. १६ सप्टेंबर २०२६, नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया (NASVI) यांच्या वतीने दि. १८ व १९ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील Constitution Club of India येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय बैठकीसाठी (AGM/राष्ट्रीय परिषद) पुणे जिल्ह्यातून पथ विक्रेता एकता समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री. दिपक मोहिते आणि संघटक सचिव श्री. संजय कांची यांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.
या राष्ट्रीय बैठकीमध्ये देशभरातील पथ विक्रेता प्रतिनिधी, TVC सदस्य, संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध राज्यांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्रयाचे विनियमन) अधिनियम, २०१४ यांच्या प्रभावी अंमलबजावणीसह पथ विक्रेत्यांचे हक्क, संरक्षण, उपजीविका, पुनर्वसन, तक्रार निवारण व्यवस्था आणि स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पथ विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी श्री. दिपक मोहिते व श्री. संजय कांची हे पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या निवडीमुळे पुणे जिल्ह्यातील पथ विक्रेता चळवळीला राष्ट्रीय स्तरावर आपले प्रश्न मांडण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, पुणे जिल्ह्यातील पथ विक्रेत्यांच्या हक्कांसाठी आणि कायदेशीर संरक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर आवाज बुलंद करण्याचा निर्धार या दोन्ही प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.
पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधी
श्री. दिपक मोहिते
अध्यक्ष, पथ विक्रेता एकता समिती महाराष्ट्र राज्य
लिडर, NASVI
श्री. संजय कांची
संघटक सचिव, पथ विक्रेता एकता समिती महाराष्ट्र राज्य
सदस्य, NASVI



