सूक्ष्म योग फाउंडेशनने दिवसभरात विविध ठिकाणी योगसत्रांचे आयोजन, हजारो नागरिकांनी घेतला लाभ




मावळ मराठा न्युज:- लोणावळा, सूक्ष्म योगा फाउंडेशन लोणावळा वर्षभर लहान मुलांपासून तर जेष्ठ नागरिक यांचे साठी योगाचे मोफत प्रशिक्षण,शिबीर, प्रचार, प्रसार करीत असते.नुकताच जागतिक योग दिनानिमित्त योग मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. फाउंडेशनने १०व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने लोनावळ्यात योग मॅरेथॉन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि क्रिया योगाने करण्यात आली २०० हून अधिक लोकांनी विविध सत्रांमध्ये सहभाग नोंदवला. यासाठी श्रीधर पूजारी ,सुरेखा जाधव आणि भाजप लोणावळा शहर अध्यक्ष अरुण लाड यांचे सहकार्य लाभले. यावेळी संस्थापक पंकज शर्मा आणि सह-संस्थापक हिमांगी वर्शने यांनी योगाचे प्रात्यक्षिक दाखवून योगाचे धडे दिले. माजी नगरसेविका ब्रिंदा गंत्रा यांनी महिलांसाठी पंकज शर्मा यांच्या नेतृत्वाखालील योग सत्रात सहभागी होऊन उपस्थितांना योगशास्त्राबद्दल प्रेरित केले आणि भविष्यात अधिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन दिले.यात प्रमुख प्रशिक्षक: हिमांगी वर्शने, पंकज शर्मा, पूजा, कांक्शी, आणि अनिता मंकार यांनी योगबद्दल मार्गदर्शन केले.त्याच प्रमाणे जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रात अध्यक्ष श्री पांडुरंग तिखे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या साठी योग सत्र घेण्यात आले. सूक्ष्म योग फाउंडेशनने दिवसभरात विविध ठिकाणी लोणावळा व्यतिरिक्त सत्रांचे आयोजन करून १००० हून अधिक लोकांना योगाचे महत्व आणि दररोज च्या धावपळीच्या जीवनात योग कसे आवश्यक आहे याबद्दल मार्गदर्शन केले.