उन्हाळ्याच्या सुट्टीची औचित्य साधत महिला मंडळ लोणावळाने बाल गोपाळांसाठी दोन दिवसीय शिबिर घेऊन खुलावला चिमुकल्यांचा चेहऱ्यावर आनंद

मावळ मराठा न्युज – लोणावळा,उन्हाळ्याच्या सुट्टीची औचित्य साधत महिला मंडळाने लहान गोपाळांसाठी दोन दिवसीय शिबिर घेऊन त्यांना दिला एक वेगळाच आनंद. महिला मंडळ लोणावळा यांनी एटीलीयर्स किड्स च्या प्रियंका रोंडल त्यांच्या सहकारी प्रणाली तारे, मानसी वाडेकर यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी केले. या शिबिरामध्ये मुलांना ड्रॉइंग, आर्ट, क्राफ्ट थोरामोठ्यांच्या गोष्टी, छत्रपती शिवाजी महाराज बद्दल भरपूर माहिती, थोडा योगा, थोडा डान्स मस्त मस्त खाऊ असे सगळे आयोजन करण्यात आले होते. आलेल्या पालकांनी देखील या उपक्रमाचे खूप खूप कौतुक केले. महिला मंडळांनी मुलांची अडचण ओळखून अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी ठेवलेल्या या शिबिराचे खूप खूप कौतुक केले. वरील शिबिर यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाचे अध्यक्ष सौ मनीषा बंबोरी आणि त्यांच्या कार्यकारिणी सौ मेधा वैद्य, सौ उमा मेहता, सौ प्रतिमा खळदकर,सौ मीनाक्षी गायकवाड, सौ सुनिता रावण,सौ श्रुतिका राणे, यांनी सहकार्य केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page