ढोल ताशाच्या गजरात आणि हजारों विद्यार्थ्यांच्या जल्लोषात ‘एमआयटी एडीटी’च्या बाप्पाला निरोप

मावळ मराठा न्यूज़ ,लोणी काळभोर,दि. २६- ढोल ताशाच्या गजरात आणि हजारों विद्यार्थ्यांच्या जल्लोषात एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातील गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी (ता.१९) रोजी प्रतिष्ठापणा झाल्यानंतर विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांकडून यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. प्रतिष्ठापणेनंतर प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करण्यासोबतच आपल्या मधुर आवाजात गायलेल्या गाण्यांना, नाटकांना प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. पारंपारिक ‘गजकर्ण’ या ढोल पथकाच्या वादनाने विसर्जन मिरवणूकीला इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईनच्या लाॅनपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी इन्स्टिट्यूट डिजाईनचे प्रमुख डाॅ.नचिकेत ठाकूर, विद्यार्थी घडामोडी प्रमुख डाॅ.सुराज भोयार यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांतील प्राध्यापक उपस्थित होते. मनसोक्त गुलालाची उधळण करत विद्यार्थ्यांनी अखेर सायंकाळी विद्यापीठातील विसर्जन घाटावर भावूक होऊन आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. या गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी, विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, डाॅ.सुनिता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page