पुण्यातील दहशतवादीचे स्लीपर सेल ए. के मोबाईल शॉप उध्वस्त करा अन्यथा भीम आर्मी कडून नेस्तनाबूत करण्याचा इशारा










आरोपी फय्याज युसूफ खान
मावळ मराठा न्युज नेटवर्क -पुणे, दि. ३१ मे २०२६ : पुण्यातील कॅम्प परिसरातील ए. के. मोबाईल हे दहशतवादी स्लीपर सेल चा अड्डा असून ते उध्वस्त करा अशी मागणी भीम आर्मी कडून प्रशासनाला करण्यात आली आहे. तसेच १० जुने २०२६ पर्यंत बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, १९६७ अन्वेय गुन्हा दाखल करून सदरील दुकान बंद करा अन्यथा भीम आर्मी कडून नेस्तनाबूत करण्याचा इशारा भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ कांबळे यांनी दिला आहे.
ए. के. मोबाईल शॉपचे मालक व चालक फय्याज युसुफ खान, अयाज युसुफ खान व साद फय्याज खान, सर्व रा. घर क्र. १५४९, गल्ली क्र. १५, भीमपुरा, कॅम्प, पुणे – ४११०००१ यांच्याबाबत स्थानिक स्तरावर काही गंभीर स्वरूपाची माहिती समोर आली आहे. तसेच फय्याज युसुफ खान याच्याविरुद्ध आंबेडकरी महिला कार्यकर्तीचा विनयभंग केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल असून सदर प्रकरणाचा तपास संबंधित पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे.
तसेच संबंधित आरोपी कुटुंबीयांविषयी गंभीर गुन्हे व दहशतवादविरोधी तपासाशी संबंध समोर आलेले आहेत. आरोपी फय्याज युसुफ खान, त्याचा मुलगा साद व त्याचा सख्खा भाऊ अयाझ हे ए. के. मोबाईल शॉप, एम. जी. रोड, फॅशन मार्केट समोर, कॅम्प, पुणे – ४११००१ येथे व्यवसाय करीत आहे.
सदर व्यवसायाचा कोणत्याही बेकायदेशीर अथवा राष्ट्रविरोधी कारवायांशी संबंध आहे किंवा नाही, याची सक्षम तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच आरोपी फय्याज युसुफ खान याचा सख्खा भाऊ अयाज युसुफ खान हा यापूर्वी मोबाईल व्यवसायाशी संबंधित असल्याचे समजते. त्याच्याविरुद्ध बंदी घालण्यात आलेल्या Students Islamic Movement of India (SIMI) व Indian Mujahideen या संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून एटीएसकडून अटक करण्यात आल्याचे विविध वृत्तांतांमधून समोर आले आहे. अहमदाबाद सिरीयल बॉम्बस्फोट प्रकरण, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण तसेच बनावट भारतीय चलनी नोटांशी संबंधित प्रकरणांमध्ये त्याची चौकशी व कारवाई झाल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याच्यावर दहशतवादी कारवायांसाठी मोबाईल फोन, सिमकार्ड व इतर साहित्य पुरविल्याचे आरोप करण्यात आले होते. तसेच तपासादरम्यान त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा, ग्रेनेड, शस्त्रे व इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याचेही विविध वृत्तांतांमधून समोर आले आहे. वरील बाबींच्या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणाची तसेच संबंधित व्यक्तींच्या सध्याच्या हालचाली, संपर्क व व्यावसायिक व्यवहारांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.
तसेच फय्याज युसुफ खान याचा दुसरा सख्खा भाऊ फिरोज युसुफ खान उर्फ फिरोज खान (टोटला) हा गंभीर संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे तसेच मुंबई बॉम्बस्फोट तपासाशी संबंधित आरोपी असल्याचे सांगितले जाते. त्याचा नंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांच्या पथकाकडून झालेल्या पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. विजय साळसकर हे स्वतः २६/११ मुंबई दहशतवादी अजमल कसाब व इतर दहशतवादी साथीदारांच्या हल्ल्यात एटीएस प्रमुख मा. हेमंत करकरे, मा. अशोक कामटे व इतर पोलीस अधिकाऱ्यांसह शहीद झाले होते. वरील सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींच्या हालचाली, संपर्क, आर्थिक व्यवहार व व्यवसायाची सक्षम यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे..
वरील बाबींच्या पार्श्वभूमीवर, संबंधित व्यक्ती फय्याज युसुफ खान, त्याचा मुलगा साद फय्याज खान व अयाज युसुफ खान हे आजही ए. के. मोबाईल शॉप, एम. जी. रोड, कॅम्प, पुणे येथे व्यवसाय करीत असल्याचे समजते. त्यामुळे संबंधित व्यक्तींच्या हालचाली, संपर्क, आर्थिक व्यवहार तसेच सदर व्यवसायाची सक्षम यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. उपलब्ध माहिती व पूर्वी समोर आलेल्या आरोपांच्या अनुषंगाने सदर व्यवसायाचा कोणत्याही बेकायदेशीर, राष्ट्रविरोधी अथवा दहशतवादी कारवायांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे किंवा नाही, याची कसून पडताळणी करणे आवश्यक आहे. चौकशीदरम्यान कोणतेही बेकायदेशीर कृत्य, संशयास्पद व्यवहार अथवा कायद्याचे उल्लंघन आढळून आल्यास संबंधित व्यक्ती व व्यवसायाविरुद्ध लागू कायद्यांनुसार तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
आरोपीच्या कुटुंबाची गंभीर गुन्हेगारी व दहशतवादी पार्श्वभूमी लक्षात घेता सदर आरोपींवर तात्काळ बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) अधिनियम (UAPA) तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी व आवश्यकतेनुसार त्यांना अटक करण्यात यावी तसेच १० जुने २०२६ पर्यंत सदरील ए. के. मोबाईल शॉप, एम. जी. रोड, फॅशन मार्केट समोर, कॅम्प, पुणे – ४११००१ हे जप्त करून सील करण्यात यावा अन्यथा भीम आर्मी कडून सदरील दुकान हे दहशतवादी कृत्यास मदत करून देश विरोधी विघातक कृत्यांमध्ये मदत करीत असल्यामुळे ते भीम आर्मी कडून १० जून २०२६ रोजी फोडण्यात येईल असा इशारा शासन प्रशासनाला भीम आर्मी कडून देण्यात आला आहे.



