महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त तळेगाव आगार आणि फ्रेंड्स ऑफ नेचर, यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण










मावळ मराठा न्युज (ऍड. गणेश जगताप)तळेगाव *वृक्षारोपण कार्यक्रम*दिनांक १ जून २०२६, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या(MSRTC) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त, MSRTC -तळेगाव आगार आणि फ्रेंड्स ऑफ नेचर, यांच्या संयुक्त विद्यमानाने एसटी डेपो-तळेगाव आगार येथे दिनांक *सोमवार दिनांक: ०१ जून २०२६ रोजी सकाळी ८:०० ते ९.३० वाजता वृक्षारोपणचा* कार्यक्रम संपन्न झाला. FONA आणि MSRTC ची टीम सर्व मिळून २१ देशी झाडांची लागवड करण्यात आली यात प्रामुख्याने आंबा, जांभूळ, पेरू, आवळा, उंबर, बदाम, कडुनिंब, मोहोगणी, सप्तपर्णी, अर्जुन, तामण, बकुळ, कदंब इत्यादी २१ देशी झाडांचा समावेश होता. फ्रेंड्स ऑफ नेचर चे सहकारी आणि एसटी डेपो तळेगाव अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आणि सहभाग घेवून वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.या प्रसंगी एसटी डेपो-तळेगाव व्यवस्थापक श्री बालाजी सूर्यवंशी, श्री आकाश जगताप, कु. प्रज्ञा पंधारे आणि त्यांचे सहकारी तसेच फ्रेंड ऑफ नेचर (FONA) तर्फे श्री. विश्वास देशपांडे, एडव्होकेट गणेश जगताप, श्री.ज्ञानेश्वर लष्करी, श्री.अजित गोखले, सौ मेधा तारे, सौ. राजश्री वाघचौरे, श्री प्रकाश पंडित, श्री निशिकांत पंचवाघ, डॉ. प्रफुल्ल काशिद श्री. तारे, श्री.जीवन पाटील, श्री. संदीप गडसिंग मोलाचे योगदान आणि श्रमदान केले. फ्रेंड्स ऑफ नेचर ला वृक्षारोपनाची संधी दिल्याबद्दल श्री. सूर्यवंशी साहेब आणि एसटी महामंडळाचे आभार, तसेच आपण सर्व सहभागी होवून वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे खुप खूप आभार.धन्यवाद. FONA कमिटी फ्रेंड्स ऑफ नेचर एसोसिएशन तळेगाव दाभाडे



