श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशाला आळंदी येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

मावळ मराठा न्युज :-आळंदी, ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत शालेय उपक्रमांतर्गत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेत या निमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले. या बालसभेचे अध्यक्ष स्थानी विद्यार्थ्यांमधून आदिती केंजळे ( इ. ४ थी ) व प्रमुख पाहुणे सार्थक विजेंद्र चाटे (इ. ४ थी ) उपस्थित होते. मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. संस्था सचिव अजित वडगांवकर यांनी दोन्ही महामानवांना अभिवादन, वंदन केले. कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले. कौतुक केले. कार्यक्रमा निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. मुख्याध्यापक प्रदीप काळे सरांनी आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्याची व साहित्याची माहिती देत त्यांच्या ठिकाणी असणारे सद्गुण आत्मसात करावे असे आवाहन केले. बालसभेत अदिती केंजळे हिने टिळकां विषयी इंग्रजीतून तर सार्थक चाटे याने आण्णाभाऊvविषयी हिंदीतून विचार मांडले. प्रशालेचे मुख्यमंत्री अद्वैत गोरे यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची माहिती दिली. इ.१ ली ते इ.४ थी च्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे बालपण, शिक्षण, कार्य व जीवनप्रवास यावर आधारित भाषणे केली. बालसभेचे नियोजन वर्गशिक्षिका वैशाली शेळके यांनी केले. वर्षा काळे ,निशा कांबळे, प्रतिभा भालेराव ,राहुल चव्हाण या शिक्षकांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य झाले. बालसभेचे आभार दुर्वा माने (इ. ४ थी) हिने मानले. बालसभेचे सूत्रसंचालन श्रुती उगले व श्रीहरी वाघमारे यांनी केले. शंकर भोजने याने पसायदान गायन करत कार्यक्रमाची सांगता झाली. इ.४ थी च्या शालेय मंत्रिमंडळाने शिस्त राखण्यास मदत केली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page