दस्त रद्द करून मला न्याय द्या,६० लाख काय ६ कोटी पण नको,सहायक निबंधक विरोधात उपोषण करणार,पीडित परदेशी कुटुंबियांचा इशारा




मावळ मराठा न्युज -लोणावळा -संतोष उर्फ राजू परदेशी व त्यांचे आई श्रीमती पद्मा छोटेलाल परदेशी यांनी पत्रकार परिषद घेत सब रजिस्ट्रार,वडगांव मावळ,सिटी सर्व्हे च्या उताऱ्यावर नोंदणी करताना आईचे नाव देखील परस्पर त्या उताऱ्यावरून वगळण्यात आल्याचा स्पष्ट आरोप केला आहे.भाड़े तत्वारील जागेचे खरेदी खत करू नये असं पत्र मावळ तालुक्यातील तीनही दस्त नोंदणी अधिकारी म्हणजे सहाय्यक निबंधकांना नगरपरिषदने दिले असताना खरेदीखत कसे होऊ शकते असा सवाल परदेशी यांनी केला.पत्रकार परिषदेत संतोष उर्फ राजू परदेशी यांनी, श्रीमती पद्मा छोटेलाल परदेशी व त्यांची चार मुले यांची लोणावळ्यामध्ये काही सामायिक जागा सिटी सर्व्हे नंबर ३९ मध्ये अर्धा हिस्सा आहे. श्रीमती पद्मा परदेशी यांनी आपल्या हिश्श्याच्या जागेचे मृत्युपत्र तयार करत त्याची चार मुलांमध्ये विभागणी केली होती. माझ्या मृत्यू पश्चात त्या जागा त्या त्या मुलांना देण्यात याव्यात असे मृत्युपत्रात नमूद करण्यात आले होते. असे असताना श्रीमती पद्मा परदेशी ह्या जिवंत असताना त्यांच्या मुलगा सुरज परदेशी याने त्यांच्या हिश्श्याची जागा त्यांनी आईला कोणती ही पूर्वकल्पना न देता शेखर पुजारी यांची मुलगी यामिनी विक्रम अमीन यांना परस्पर विक्री केली आहे. सदर जागेचे हक्कसोड पत्र करताना संबंधित मुलाने आपल्या इतर दोन भाऊ व एक बहीण यांचे हक्कसोड पत्र घेतले व सिटी सर्व्हे च्या उताऱ्यावर नोंदणी करताना आईचे नाव देखील परस्पर त्या उताऱ्यावरून वगळले. आईने कोणतीही हक्क सोड पत्र दिलेले नसताना तिचे नाव फेरफार नोंद करताना परस्पर उताऱ्यावरून वगळण्यात आले आहे तसेच आई जिवंत असताना २०१४ साली मृत्युपत्र सहाय्यक निबंधका कडे नोंदणी केलेलं असताना त्याचा कोणताही आधार सहायक निबंधक,तलाठी,मंडल अधिकारी आणि सिटी सर्व्हे विभागाने घेतलेला दिसत नाही. परस्पर सर्व अधिकारी यांनी आर्थिक व्यवहार करून सदर जागेची विक्री करण्यात आली आहे. हा असा फसवणुकीचा प्रकार झाला असल्याने सदर जागेचे झालेले दस्त हे तात्काळ रद्द करण्यात यावे व खोटे दस्तऐवज बनवणारे सहायक निबंधक,मंडल अधिकारी आणि संबंधित सर्वांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी श्रीमती पद्मा परदेशी व संतोष उर्फ राजू परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. लोणावळा शहर पोलिसांकडे अनेक वेळा जाऊन देखील ते गुन्हा दाखल करायला तयार नसल्याने अखेर याप्रकरणी वडगाव मावळ न्यायालय मध्ये केस दाखल करण्यात आली असल्याचे देखील आई पद्मा आणि मुलगा राजू परदेशीं यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.लोणावळा,खंडाळा हे जागतिक पातळीवरील एक महत्वाचे एक थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे जमिनीच्या किमती या आकाशाला भिडल्या आहेत.त्यामुळे याठिकाणी पोस्टिंग करून घेण्यासाठी शासकीय अधिकारी यात पोलीस निरीक्षक,सहाय्यक निबंधक,तलाठी,मंडल अधिकारी,तहसीलदार हे मोठी रक्कम मोजतात,आणि ती रक्कम वसुल करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊन असे बोगस,बनावट फसवणूकीची प्रकार वरिष्ठ्यांच्या आशिर्वादा करतात. असे प्रकार मावळ तालुक्यात सर्रास सुरु आहेत.मावळात तळेगाव लोणावळा आणि वडगांव अशी तीन सहायक निबंधक कार्यालये आहेत.तर पद्मा परदेशीं यांची मालमत्ता लोणावळ्यात असताना दस्त वडगांव यासाठीच केला की कोणी ओळखीचे भेटू नये. जी लोणावळा,तळेगाव येथे होण्यासारखी नसतात तर वडगांवला पैसे देऊन होतात हे सर्वच या क्षेत्रात काम करणार्यांना माहित आहे.गुंठेवारी लोणावळा,तळेगाव येथे होत नाही पण वडगांवला प्रती गुंठा १० हजार हा दर ठरलेला आहे. अश्या भ्रष्ट सहाय्यक निबंधकाची नुसती बदली किंवा बडतर्फ करून चालणार नाही तर यांचेवर फोजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत यासाठी आम्ही मावळ तालुका अण्णा हजारे प्रणित भ्रष्ट्राचार विरोधी जनआंदोलन न्यास मार्फत पाठ पुरावा करणार आहोत.




