हिंदुराष्ट्र सेना मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर,चंद्रकांत बोंबले यांची मावळ तालुका अध्यक्षपदी तर शुभम कुंभार यांची कोषाध्यक्ष पदी निवड

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,नुकत्याच झालेल्या बैठकीत हिंदुतेज सूर्य गुरुवर्य हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजयभाई देसाई याचा आशीर्वादाने मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नवीन पदाधिकारी यांना त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत. नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे:- चंद्रकांत सुरेश बोंबले यांची मावळ तालुका प्रमुख,सुरेश भगवान सातकर मावळ तालुका उपाध्यक्ष,अजय अशोक शिळावणे मावळ तालुका संपर्क प्रमुख पदी तर शुभम अनिल कुंभार यांची मावळ तालुका कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.अमोल ज्ञानदेव जगताप यांची मावळ तालुका कार्याध्यक्ष पदी तर रवींद्र रामदास राऊत यांची मावळ तालुका संघटक पदी,ओमकार दत्ता आरडे यांची मावळ तालुका संघटक पदी तर दिपक बाळू जाधव यांची आणि ओमकार मोहन टेकाळे यांची संघटक पदी निवड करण्यात आली आहे.पुढील वाटचालीस नवनिर्वाचित पदाधिकारी यांना मावळ मराठा न्युज परिवारच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page