व्ही पीएस शाळेच्या १९८७ सालच्या १० वी बॅच च्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक दत्तात्रय येवले यांच्या सन्मान








मावळ मराठा न्युज – लोणावळा,दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी लोणावळा नगरपरीषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक दत्ताभाउ येवले यांचा सत्कार व्ही पीएस हायस्कुल च्या १९८७ ह्या दहावीच्या बॅचच्या वतीने सन्मान करण्यात आला.तसेच लोणावळा ट्रॅकर्स ह्या ग्रुपच्या साहसी गिर्यारोहकांचा दिलीप आंबेकर ऍडवोकेट जयवंत देशमुख,संजय कपोते, एडवोकेट संदीप अग्रवाल,हेमंत वांजळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या छोटेखानी झालेल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जितू छल्लाणी यांनीतर सूत्रसंचालन एडवोकेट जयवंत देशमुख यांनी केले. दिलीप आंबेकर, संजय कपोते,नवनिर्वाचित नगरसेवक दत्तात्रेय येवले, एडवोकेट जयवंत देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.



