शंकरबन प्रतिष्ठान,लोणावळा यांच्या वतीने अध्यात्मिक संवादाचे आयोजन



मावळ मराठा न्युज लोणावळा,शंकरबन प्रतिष्ठान लोणावळा ता. मावळ जि पुणे यांच्या कडून रविवार दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२:३० ते ०२:०० या वेळेत सुमित्रा हॉल भांगरवाडी, लोणावळा येथे सुप्रसिद्ध अध्यात्मिक लेखक श्री मिलिंद कर्वे यांची अध्यात्मिक भेट व संवाद असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सदरच्या कार्यक्रमास सर्वांना विनामूल्य प्रवेश असून या कार्यक्रमा मधून सद्गुरू श्री शंकर महाराजांचे अनेक पैलू उलघडणार आहेत. श्री मिलिंद कर्वे हे जोतिषशास्त्र व मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक असून ते सायको थेरेपिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या वर आधारित तीन अध्यात्मिक पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांचे “शून्यसाक्षी” हे अत्यंत अद्भुत अध्यात्मिक प्रचिती देणारे पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहे. तरी सद्गुरू भक्तांनी व अध्यात्माची आवड असलेल्या श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री मनोहर (राजू दादा ) निकम यांनी आवाहन केले आहे.




