गौरव उमटे या चिमुकल्याचे आरोग्य सुधारण्यासाठी लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांचा मदतीचा हात

मावळ मराठा न्युज – कुसगांव,लोणावळा गुरव वस्ती,लोणावळा येथे राहणाऱ्या एका १३ वर्षीय गौरव चिमुकल्याला एका गंभीर आजाराने त्रासले आहे. ६ महिने जवळपास केईएम रुग्णालयात उपचार करून आई वैशाली उमटे यांनी त्याची काळजी घेतली सोबत घर संसारचाचा गाडा दोन्ही आई वडील कसाबसा ओढत त्याची घरच्या घरी काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. उमटे कुटुंबाची घराची परिस्थिती नाजूक आणि हलाखीची असल्याने औषधं उपचार,मशीनरी भाड्याने घेऊन गौरवची काळजी घेणे कुटुंबाला खूप अवघड जात आहे. ही स्थिती लोणावळ्यातील आरोग्य दूत अशी ओळख असलेले नंदकिशोर खंडेलवाल यांना कळताच त्यांनी स्वतः धाव घेत गौरव जो जीवनाशी झुंज देतोय त्यासाठी काय काय करता येईल? औषधे,यंत्र सामुग्री देता येईल का यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळताना दिसत आहे. लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळाच्या माध्यमातून डॉ ला.पोपट ओसवाल यांनी स्वतः रुग्णाला भेट देऊन ५ हजार रोख तातडीची मदत केली,त्यानंतर लगेचच लायन आशिष पॉन,ला.लीना पॉन,लायुवराज शेट्टी,ला.स्वतंत्र कुमार अगरवाल,विकी पालरेशा यांनी सर्वांनी मिळून १७ हजार रुपयाची रोख मदत केल्याने उमटे परिवाराला त्याची मोठी मदत झाली असल्याचे आई वैशाली उमटे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.या चिमुकल्याला अजून मदतीची गरज असल्याने इच्छुक दानशूर मान्यवर यांनी खाली दिलेल्या रुग्णाच्या आईशी थेट संपर्क साधून मदत करावी अशी मावळ मराठा न्यूज च्या माध्यमातून करण्यात येत आहे.
संपर्क –
सौ.वैशाली उमटे – ७३५०६०९१०७










