मावळमध्ये महायुती लोकसभा उमेदवारचा तिढा सुटता सुटेना, आता शंकर जगताप यांना उमेदवारी ?


मावळ मराठा न्युज :-लोणावळा, मूळ शिवसेनेचे दोन शकलं झाली. शिंदे आणि ठाकरे गट.मावळ हा मूळ शिवसेनेचा बालेकिल्ला बाळासाहेब ठाकरे असे पर्यंत मावळ मतदार संघावर कोणत्या पक्षाची दावा ठोकण्याची हिम्मत झाली नाही. उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत सरकारमध्ये होते त्यात अजित पवार असल्याने मावळ लोकसभा राष्ट्रवादी कडे जाईल आणि पार्थ पवार यांना पुन्हा उमेदवारी मिळेल या भीतीने बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यांना वाटले आपले तिकीट पक्के परंतु आता बारणे त्यापेक्षा जास्त गोत्यात आल्याचे सध्याचे चित्र दिसतेय.भाजपचे दोन दावेदार,एक भेगडे तर दुसरे जगताप, तर राष्ट्रवादी कडून शेळके.आता तिकीट मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.आणि जरी बारणे यांना तिकीट मिळाले तरी अंतर्गत भाजप किती मदत करेल,राष्ट्रवादी अजित पवार गट कसा मदत करेल आणि उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे रिंगणात असल्याने कोण बाजी मारेल हे पण मावळ साठी खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. मावळ लोकसभा महा युतीचा तिढा सुटताना दिसत नाही.राष्ट्रवादी काँग्रेस चे मावळ चे आमदार सुनील शेळके यांनी शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांना विरोध केला,नंतर भाजपचे संजय बाळा भेगडे यांच्या उमेदवारी साठी कार्यकर्ते आग्रही होते ते वातावरण शांत होतं नाही तो पर्यंत आता शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पिंपरी चे भाजप शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे. त्यामुळे महायुतीत मावळच्या उमेदवारीचा तिढा सुटण्या ऐवजी वाढतच असल्याचे चित्र दिसते. महायुतीत मावळची जागा शंकर जगताप म्हणजे भाजपलाच मिळावी. शहराध्यक्ष म्हणून जगताप करत असलेले कार्य याचा विचार करून त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा विजय निश्चित होईल असे फडणवीस यांच्या कडे निवेदनातून केली आहे. याचा महायुतीला म्हणजे थेट भाजपला विशेष फायदा होईल, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत यांचे बंधू दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेकापकडून निवडणूक लढविली याचा देखील फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळे जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी काळभोर यांनी केली आहे. त्यामुळे आता मावळ लोकसभा साठी आणखी एका नेत्याची भर पडली आहे. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना आयत्या वेळी उमेदवारी मिळेल की महायुतीमधील तिढा वाढतच जाणार, यातून नेमका कसा मार्ग काढला जातो, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. थोडक्यात महायुतीतील तिढा सुटण्याऐवजी वाढताना दिसत आहे.




