संविधान गौरव समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात वास्तुविशारद माजी नगरसेवक श्री.दत्तात्रय रामचंद्र येवले यांची एकमताने निवड




मावळ मराठा न्यूज -लोणावळा भारतीय संविधानाला ७५ वर्षें पूर्ण होत असल्याने लोणावळा शहरात संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.त्याकरिता संविधान गौरव समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात वास्तुविशारद माजी नगरसेवक श्री.दत्तात्रय रामचंद्र येवले यांची एकमताने निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक नासिरभाई शेख व कार्य कारणीमध्ये माजी नगरसेवक निखिलभाऊ कविश्वर, माजी नगरसेवक नारायणभाऊ पाळेकर, बापूलाल तारे, ललितशेठ सिसोदिया, गणेश गायकवाड, प्रविण कांबळे यांची निवड करण्यात आली. अशी माहीती संविधान गौरव समितीचे मुख्य प्रवर्तक व मुख्य निमंत्रक पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष श्री. सुर्यकांत वाघमारे यांनी दिली. श्री दत्तात्रय येवले यांचे मावळ मराठा न्यूज परिवाराकडून समिती अध्यक्ष पदी निवड झालाबद्दल अभिनंदन




