भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराचे धडाडीचे कार्यकर्ते हर्षल भिमाजी होगले यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ओबीसी आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड


मावळ मराठा न्युज :- लोणावळा,हर्षल भिमाजी होगले२००३ साली भाजपा मध्ये तत्कालीन अध्यक्ष दादा धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार दिगंबर भेगडे यांच्या हस्ते भाजपा मध्ये प्रवेश करण्यात आला२००३ ते २००८ भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष २००९ ते २०१४ भाजपा युवा मोर्चा कार्याध्यक्ष२०१४ ते २०१७ भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष२०१७ ते २०२१ भाजपा कडून लोणावळा नगरपालिकेवर वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली. २०२१ ते २०२३ भाजपा ओबीसी आघाडी अध्यक्ष लोणावळा शहर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेविका सुमन होगले यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय व सामाजिक क्षेत्रात कामं केले आहे.याच कामाची दखल घेऊन भाजपा ओबीसी आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी होगले यांची निवड करण्यात आली. त्यांना मावळ मराठा न्युज परिवाराकडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.




