श्रीराम चरणी आमदार सुनिल आण्णा शेळके आणि भोर–वेल्हा–मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचा विजयाचा मान अर्पण केला आंबवणेकरांनी

मावळ मराठा न्युज नेटवर्क – अयोध्या,अयोध्या धाम येथे आंबवणेकर नतमस्तक झाले.श्रीराम जन्मभूमी काशी विश्वनाथ आणि बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंग येथे भोर–वेल्हा–मुळशी विधानसभा मतदार संघातील आंबवणे गावातील मिलिंददादा युवा मंचच्या वतीने विधानसभेतील व मावळ लोकसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल आण्णा शेळके आणि भोर–वेल्हा–मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांची विधानसभा मतदार संघातून आमदार पदी निवड झाली. त्या निमित्त आंबवणे येथील युवक व नागरिक यांनी प्रभू राम लल्ला च्या चरणी भव्य विजयाबद्दल विशेष अभिवादन केले.यावेळी श्रीराम चरणी मायबाप जनतेने प्रचंड बहुमताने आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल दोन्ही आमदारांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.तसेच आमदार शेळके व आमदार मांडेकर यांना भावी राजकीय वाटचालीसाठी तसेच मंत्री पदासाठी आंबवणे गावातील मिलिंददादा युवा मंचच्या वतीने शुभेच्छा दिल्या.आणि प्रभू श्रीरामाच्या चरणी साकडे घालण्यात आले. प्रभू रामाच्या आशीर्वादाने नवा विकास आणि समृद्धीचा मार्ग खुला होवो अशी मनापासून ईच्छा मिलिंद दादा वाळंज यांनी व्यक्त केली. या प्रवासात बहुसंख्य आंबवणेकर सहभागी झाले. आपल्या सोबत दोन्ही आमदारांचे अभिनंदनाचे पोस्टर अयोध्ये येथे प्रदर्शीत केले. व आत्मीयता पूर्वक जयघोष केला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page