हरवला आहे !!!लोणावळा,तुंगार्ली येथील मेरीटस रिसॉर्ट येथून ५७ वर्षीय इसम हरवला आहे



मावळ मराठा न्यूज लोणावळा,लोणावळ्यातील लाखन सिंग जगतसिंग बुंदेला वय- ५७ वर्षे दिनांक- ०२/०३/२०२३ रोजी सायंकाळी ०५/०० वा चे सुमारास मेरीटस रिसॉर्ट, तुंगार्ली, लोणावऴा ता. मावळ जि. पुणे येथून हरवले आहेत. अशी तक्रार दुष्यंत सिंग लाखन सिंग बुंदेला रा.गाव रंगवाना, छतरपुर ,मध्य प्रदेश यांनी लोणावळा शहर पोलिस स्टेशन ला दिनाक ०३/०३/२०२३ दिली आहे. त्यात त्यांनी त्यांचे वडील लाखन सिंग जगतसिंग बुंदेला वय- ५७ वर्षे हे कोणास काही एक न सांगता मेरिटोस रिसॉर्ट तुंगार्ली लोणावळा येथून निघुन गेले आहेत खबर देणार यांनी त्यांचा आजुबाजुचे परिसरात शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही. तरी त्यांचा शोध व्हावा. सदर खबर वरुन मिंसींग रजिस्टरी दाखल करुन लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सीताराम डूबल यांच्या मार्गदर्शन आणि आदेशान्वये पुढील तपास पोलीस हवालदार उंडे बक्कल नंबर २१७७ हे करीत आहेत ,दाखल अंमलदार पोलीस हवालदार अबनावे बक्कल नंबर २०६३ हरवल्याची नोंद दाखल केली आहे.लाखन सिंग जगतसिंग बुंदेला याचे वर्णन खालील प्रमाणे :-वय- ५७ वर्षे रा.गाव रंगवाना छतरपुर मध्यप्रदेश रंग- सावळा उंची ५ फुट,बांधा सडपातऴ केस पांढरे नाक सरऴ, अंगात पिवऴे रंगाचा फुल बाहयाचा शर्ट, काऴे रंगाची पॅन्ट, बोली भाषा-हिंदी, बुंदेली.सदर इसम कोणास आढळून आल्यास लोणावळा शहर पोलिस स्टेशन ला संपर्क करावयाचा आहे. किंवा नातेवाईक याना ९९०७२०२२४८ या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.




