शिवसेवा प्रतिष्ठान संचलित संस्कार वर्ग केंद्र क्र.२ चे अक्षय तृतीयेला उद्घाटन




मावळ मराठा न्युज – लोणावळा,शिवसेवा प्रतिष्ठान गेली ८ वर्षे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहे. लोणावळ्यातील नगरपालिका शाळा क्रमांक १ या ठिकाणी सुरू केलेल्या संस्कार वर्गाला २ वर्ष ४ महिने पूर्ण झाले. याचेच पुढचे पाऊल म्हणून शिवसेवा प्रातिष्ठांन ने भांगरवाडी लोणावळा येथे संस्कार वर्गाचे दुसरे केंद्र सुरू करण्याचे ठरविले. या केंद्रासाठी विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष ॲड. माधवराव भोंडे व सचिव सौ. राधिका भोंडे यांनी त्यांच्या ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलची जागा उपलब्ध करून दिली. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 30 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी ६.०० वाजता या केंद्राचे उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोणावळा रेल्वे स्टेशन चे स्टेशन मास्तर जी.पी. यादव हे उपस्थित होते. सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक असलेल्या संस्कार वर्गाची गरज लक्षात घेऊन शिवसेवा प्रतिष्ठान ने उचललेले हे पाऊल समाजासाठी खूपच उपयुक्त होईल असे श्री. जी.पी. यादव म्हणाले. प्रास्ताविकामध्ये श्री. प्रमोद देशपांडे यांनी शिवसेवा प्रतिष्ठानच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. शिवसेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. धनंजय चंद्रात्रे यांनी पालकांना या संस्कार वर्गात सक्रिय सहभाग घेऊन आपणही संस्कार वर्ग चालवावा असे आवाहन केले. काळाची गरज लक्षात घेता सर्वत्र संस्कार वर्ग सुरू होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. भांगरवाडी व परिसरातील अनेक महिला व पुरुष या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्कार वर्गाच्या पहिल्या केंद्रातील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी ईशस्तवन, गणपती स्तोत्र व पसायदान सादर केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा मेहता यांनी केले. संस्कार वर्गाची संपूर्ण माहिती सौ. सुचेता खळदकर यांनी सांगितली. पालकांनी या संस्कार वर्गामुळे आपल्या पाल्यांमध्ये व कुटुंबामध्ये झालेले बदल उस्फूर्तपणे सांगितले.भांगरवाडी येथील संस्कार वर्गासाठी संचालिका म्हणून सौ. वीणा पिंगळे व सारिका फडके या कार्य करणार आहेत.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसेवा प्रतिष्ठान चे अजित घमंडे, राजेश येवले, राजेश कामठे, रितेश गुप्ता, श्रीराम मेहता, सुनील व्हरांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. राजेश येवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. संस्कार वर्गाच्या एका चिमुकल्या विद्यार्थिनी च्या पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.




