पिंपरी चिंचवड शहराचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांना दौंड येथे”राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार

मावळ मराठा न्यूज -आज दि.१२.०७.२०२६ दौंड येथे एस आर पी एफ ग्रुप नं. ०७ मंगल कार्यालया मध्ये ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित यांच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमा मध्ये राज्यातुन आलेल्या १५ निवडक सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये कासारवाडीचे सुपुत्र समाजसेवेतील अष्टपैलु व्यक्तीमत्व ज्यांनी अनेक क्षेत्रात धार्मिक , कला , क्रिडा , शैक्षणिक , सांस्कृतिक , उद्योग , पत्रकारिता , पर्यावरण , आरोग्य , राजकिय , साहित्यिक , सहकार , कृषी , विज्ञान , शासकीय व निम शासकीय सेवेत वैशिष्ट्यपुर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावीवृत्तीने उल्लेखनिय कामगिरी करत असल्यामुळे राष्ट्रसंताच्या विचारांचा , सेवा , समर्पण आणि मानवतेच्या भावनेचा खरा आदर्श जपून तसेच जीवनात आलेल्या कोणत्याही दुःखाचे किवा संकटाचे ओझे कधी जाणवु दिले नाही . संकटे येतात आणि जातात , परंतु त्यांना सामोरे जाण्याची दुर्मिळ ताकद , धैर्य आणि चिकाटी आपल्या व्यक्तिमत्वात सदैव दिसून येते. स्वताःच्या दुःखाची पर्वा न करता दुसर्‍यांचे दुःख निवारण्यासाठी सदैव पुढे धाव घेण्याची तुमची वृती आजही प्रेरणादायी असल्यामुळे लोकांना दिलेल्या आशेने आणि समाजहितासाठी केलेल्या आथक प्रयत्न समाजामध्ये एक अलौकिक ठसा तुम्ही उमटवलाशुन्यातुन जग निर्माण करणं काय असत हे आपण सिद्ध केले . राखेतून पुन्हा उभा राहणार्‍या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आपली जिद्द , ध्येयनिष्ठा आणि आव्हानांना न घाबरणारी वृत्ती पाहून संस्थेने राज्यात उल्लेखनिय तसेच सर्वोत्कृष्ट समजला जाणारा ” राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२६ ” पैलवान काळुराम लांडगे यांना सन्मानचिन्ह , सन्मानपत्र व मेडल पदक सन्मानीय प्रमुख पाहूणे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य मा.श्री.साहेबराव पोळ ,नाशिकचे राज्य उत्पादन शुल्काचे पोलीस अधिक्षक मा.श्री.संतोष झगडे साहेब ,दौंड शहराच्या भा.ज.प. च्या उपाध्यक्षा मा.सौ.सरिताताई कुल ,गोपाळवाडीच्या सरपंच सौ.स्वातीताई पवार* यांच्या शुभहस्ते पुरस्कार बहाल करण्यात आला.कार्यक्रम संपुर्ण पारपाडण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.सदाशिव रणदिवे व त्यांच्या संपुर्ण टिमने प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दिनेश पवार सर यांनी केले.कार्यक्रमासाठी पुरस्कार्थी व त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page