लोणावळा नगरपरिषदेच्या सभागृहात साहित्यरत्न शिवशाहीर डॉ आण्णा भाऊसाठे व आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे यांचा फोटो न लावणार्या प्रशासनाचा निषेध- कृष्णा साबळे

मावळ मराठा न्युज- लोणावळा,लोनावळा नगरपरिषदमधील सभागृहात सर्व महापुरुषांचे फोटो लावले आहेत.परंतु मातंग समाजाचे दैवत अस्मिता असलेले साहित्यरत्न शिवशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे व आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे यांचे फोटो लावण्यात आलेले नाही तसेच महापुरुषांच्या लाईनमध्ये इतरांना बसवण्यात आलेल आहे.ही निंदनीय बाब शिवशाही व्यापारी संघ मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे यांच्या निदर्शनास आली.त्यांच्या या निंदनीय कृत्याचा शिवशाही व्यापारी संघाच्या व सकल मातंग समाज मावळ तालुक्याच्या वतीने निषेध करित आहोत.लोनावळा नगरपरिषद मध्ये तात्काळ वरील फोटो लावण्यात यावे अन्यथा संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात येईल असा इशारा साबळे यांनी दिला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page