सरपंच ते न्यायाधीश असा प्रवास असणाऱ्या पहिल्या महिला मोहिनी भागवत शेलार


मावळ मराठा न्यूज,पुणे जिल्ह्यातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरपंच तरुणीची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी निवड झाली आहे. ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) यांनी सरपंच ते न्यायाधीश असा प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.दौंड तालुक्यातील मळद गावच्या विद्यमान सरपंच ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारीपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे. विद्यमान सरपंच ते न्यायाधीश अशी वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.




