तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोहरम सणाच्या अनुषंगाने रूट मार्च

मावळ मराठा न्यूज़ :-तळेगाव ,(प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज दिनांक २८/७/२०२३ रोजी सायंकाळी पाच ते सव्वा सहा वाजेपर्यंत उद्या दिनांक २९/०७/२०२३ रोजी होणाऱ्या मोहरम सणाच्या अनुषंगाने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील मारुती मंदिर चौक ते तेली आळी चौक ते राजेंद्र चौक ते जामा मस्जिद ते गणपती चौक ते शाळा चौक ते सुभाष चौक ते जिजामाता चौक ते मारुती मंदिर चौक या ठिकाणापर्यंत रूट मार्च घेण्यात आलेला आहे.सदरच्या रूट मार्च करिता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्या समवेत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन कडील, १ वपोनि, ३ सपोनि/पोसाई अधिकारी व १५ अंमलदार व एस आर पी एफ चे २५ अंमलदार उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page