मनशक्ती केंद्र लोणावळा यांच्या वतीने पाली येथील आदिवासी शाळेतील ४११ विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा







मावळ मराठा न्युज नेटवर्क -पाली,शनिवारी, दिनांक ५ -७ -२०२५ ,रोजी,दुर्गम भागातील “अनुदानित प्राथमिक- माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा वावळोली- पाली , तालुका सुधागड,जिल्हा रायगड” येथे “मनशक्ति प्रयोग केंद्र” लोणावळा, आयोजित विनामूल्य आरोग्य सेवा-औषधे वाटप व मनशक्ति ज्ञान साहित्य वाटप पार पडले. तेथे सुमारे ४११ विद्यार्थी-विद्यार्थिनी व ८ प्रौढ व्यक्तिंना लाभ मिळाला. या उपक्रमासाठी “मनशक्ति प्रयोग केंद्राचे” साधक डॉ.अमेय दळवी,डॉ.वसुधा पवार, श्रीमती ज्योती चव्हाण, श्री नंदकिशोर ( राजुशेट ) खंडेलवाल, कु. शांति परब, श्रीमती शोभा पाटेकर, श्री.अमित आग्रे,श्रीमती श्रद्धा आग्रे, श्री. विशाल संसारे, श्री.गिरिश सावंत,डॉ सुहास गोसावी हे सेवेसाठी उपस्थित होते.




