स्वप्नसिद्धी गणपती मंदिर,श्री स्वामी समर्थ मठ मळवली येथे स्थापनेनंतरची पहिलीच गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी

मावळ मराठा न्युज- मळवली, स्वप्नसिद्धी गणपती मंदिर आणि श्री स्वामी समर्थ मठ मळवली पाटण येथे गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरणात ह्या मठाच्या स्थापनेनंतरची पहिलीच गुरूपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या मठाच्या संस्थापक ॲड.सीमा शर्मा हे जाधव (दिया मार्तंड) यांच्या उपस्थितीत पहाटे ५ ते संध्याकाळी ६ पर्यंत पूजा आरती, भजन,साधना आणि दुपारचा महाप्रसाद आणि संध्याकाळी दिव्य हिलिंग सेशन करून संपन्न झाला. ह्या मठात दर गुरुवारी मध्यान्ह आरती आणि महाप्रसाद याचे नियोजन करण्यात येते आणि बोरज,पाटण, मळवली,भाजे येथील अनेक स्वामी भक्त या मठाच्या स्वामीसेवेत सहभागी होत असतात, आणि त्यांना विविध प्रकारचे स्वामींच्या सेवेत आनंद मिळत आहे, ह्या मठाच्या स्थापनेमागे अँड सीमा शर्मा यांची धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यातून जनसमुदायास एक मन:शांती आणि स्वानंद अनुंभव देण्याचा मानस असल्याचा त्यांनी मावळ मराठा न्युज शी बोलतांना व्यक्त केला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page