सुन्नी मुस्लिम जमात लोणावळा ट्रस्टच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षपदाचा रफिक शेख यांचा तडकाफडकी राजीनामा; वक्फ बोर्डचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर






मावळ मराठा न्युज – महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या दिनांक २५ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीत सुन्नी मुस्लिम जमात लोणावळा ट्रस्टचे तत्कालीन विश्वस्त मंडळ बरखास्त करून नवीन तदर्थ समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीच्या अध्यक्षपदी रफिक शेख यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र समितीतील काही सदस्यांकडून सातत्याने येत असलेल्या दबावामुळे व मानसिक त्रासामुळे सदर पदावर कार्यरत राहणे शक्य नाही. त्यामुळे सुन्नी मुस्लिम जमात लोणावळा ट्रस्टच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षपदाचा तसेच संस्थेच्या व्यवस्थापनाशी संबंधित सर्व अधिकृत जबाबदाऱ्यांचा दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ पासून राजीनामा सादर करीत असल्याचे रफिक शेख यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.रफिक शेख यांच्या नियुक्तीनंतर संस्थेच्या व्यवस्थापन व कारभारासंदर्भात तदर्थ समितीतील काही सदस्यांकडून सातत्याने दबाव आणला जात आहे. त्यात
१. संस्थेच्या बँक खात्यांमध्ये काही इतर समिती सदस्यांना अधिकृत स्वाक्षरीधारक (Authorised Signatories) म्हणून नियुक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या पत्रांवर व कागदपत्रांवर माझी स्वाक्षरी घेण्याचा दबाव आणला जात आहे.
२. संस्थेची मूळ कागदपत्रे, महत्त्वाचे अभिलेख, नोंदवह्या व इतर महत्त्वाची कागदपत्रे ज्या कपाटांमध्ये व सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत, त्या कपाटांच्या सर्व चाव्या इतर सदस्यांकडे सुपूर्द करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे.वरील बाबींमुळे संस्थेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेबाबत तसेच त्यांच्या योग्य जतनाबाबत माझ्या मनात गंभीर शंका व चिंता निर्माण झाली आहे. योग्य नोंद, कागदपत्रांची यादी (Inventory) व अधिकृत हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण न करता सदर कागदपत्रांचा ताबा दिल्यास ती कागदपत्रे गहाळ होण्याची, गैरवापर होण्याची अथवा अनधिकृतपणे वापरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.असेही रफिक शेख यांनी पत्रात नमूद केले आहे.संस्थेच्या आर्थिक निधीचा गैरवापर होऊ नये तसैच संस्थेच्या आर्थिक हिताचे संरक्षण व्हावे, यासाठी बँक खात्यांच्या स्वाक्षरी अधिकारांमध्ये कोणताही बदल हा योग्य ठराव, सक्षम प्राधिकरणाची परवानगी व नियमानुसारच करण्यात यावा, असे रफिक शेख यांचे मत आहे. संस्थेची मालमत्ता,आर्थिक निधी,मूळ कागदपत्रे व संस्थेचे हित सुरक्षित राहावे मात्र, सध्याच्या परिस्थितीत माझ्यावर येत असलेल्या सततच्या दबावामुळे व मानसिक त्रासामुळे अध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या पार पाडणे अत्यंत कठीण झाले आहे.
संस्थेची दिनांक ३० सप्टेंबर २०२६ पर्यंतची आर्थिक विवरणपत्रे व हिशेब तयार करण्यात आलेले आहेत, जेणेकरून संस्थेच्या आर्थिक नोंदी योग्य प्रकारे जतन करता येतील.वरील सर्व परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळास नम्र विनंती आहे की:सुन्नी मुस्लिम जमात लोणावळा ट्रस्टच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षपदाचा तसेच संस्थेच्या व्यवस्थापनाशी संबंधित सर्व अधिकृत जबाबदाऱ्यांचा दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ पासूनचा राजीनामा कृपया स्वीकारण्यात यावा.राजीनामा स्वीकारून दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ पासून संस्थेच्या सर्व प्रशासकीय, आर्थिक व व्यवस्थापकीय जबाबदाऱ्यां मधून मुक्त करण्यात यावे.
संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही संस्थेची व समाजाची सेवा करण्याच्या प्रामाणिक उद्देशाने स्वीकारली होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत या पदावर कार्यरत राहणे शक्य नसल्याने, राजीनामा स्वीकारून सदर जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, असेही रफिक शेख यांनी म्हटले आहे.रफिक शेख मीनारा मज्जिदचे चेअरमन आहेत तर हॉइस चेअरमन अन्वर निंबर्गी,ट्रस्टी हाफिज शेख, ट्रस्टी हाजी नूरअहमद काठेवाडी,ट्रस्टी सलीम मनियार मान्यवर या ट्रस्ट वर आहेत.
हे ट्रस्टी निवडून आलेले नाहीत तर वक़्फ़बोर्ड येथे जाऊन स्वतःची तीनही ट्रस्टी म्हणून निवड करून आले आहेत. ही कायम स्वरूपी निवड नाही. मागील वेळेस जनरल बोर्ड मिटिंग रद्द झाल्याने त्या तिघांनी थेट वक्फ बोर्ड कडून आपली निवड केली.नियमानुसार जनरल बोर्ड मध्ये ठराव होऊन निवड प्रक्रिया होणं गरजेचे असते.परंतु ते जनरल बोर्ड घ्यायला तयारच नाही. मरहुम हाजी पटेल यांचे अचानक निधन झाल्याने अचानक अध्यक्षपदाची जबाबदारी आली होती असेही रफिक शेख यांनी म्हटले आहे.



