*ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या राष्ट्रीय महामंत्री म्हणून श्री धनंजय चंद्रात्रे यांची बिनविरोध निवड झाली.*







मावळ मराठा न्युज -लोणावळा,ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशन चे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक ३१ ऑक्टोबर आणि ०१ नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगाल येथील सिलिगुडीला पार पडले. या अधिवेशनात संपूर्ण देशभरातील हजारो स्टेशन मास्टर सहभागी झाले होते. देशभरातल्या सर्व डिव्हिजन मधून तसेच सर्व झोन मधून स्टेशन मास्टर या अधिवेशनाला दर दोन वर्षांनी एकत्र येतात आणि आपली नवीन कार्यकारणी निवडतात. संपूर्ण देशभरात एकूण ३४००० स्टेशन मास्टर कार्य करत आहेत. या अधिवेशनात राष्ट्रीय महामंत्री म्हणून श्री धनंजय चंद्रात्रे,पुणे यांची बिनविरोध निवड झाली.माजी पंतप्रधान,भारतरत्न,कै अटल बिहारी वाजपेयी यांनी या संघटनेची स्थापना केली होती. तसेच ते १४ वर्षे या संघटनेचे प्रमुख होते. स्टेशन मास्तरांचे प्रश्न सोडवणारी तसेच लढणारी ही देशभरातली एकमेव संघटना आहे.वाढत्या गाड्या आणि त्यामुळे होणारा त्रास,स्ट्रेस लेवल,कामाचा प्रचंड व्याप,या सर्वांमधून अनेक प्रश्न स्टेशन मास्तरांच्या समोर उभे असतात. स्टेशन मास्टराची ही संघटना गेले कित्येक वर्ष स्टेशन मास्तरांच्या समस्या सोडवीत आहेत,आंदोलने करीत आहेत.आठवे पे कमिशन,खूप मोठ्या प्रमाणात व्हॅकेंसी,त्यामुळे वाढलेली स्ट्रेस लेवल, अधिकाऱ्यांचा मनमानीपणा आणि त्यामुळे छोट्या छोट्या कारणांनी मिळणारी चार्जशीट्स अशी अनेक आव्हान समोर असताना श्री धनंजय चंद्रात्रे यांची झालेली ही निवड म्हणजे त्यांच्या समोर खरोखरच एक आव्हान आहे.देशभरातल्या सर्व ठिकाणाहून त्यांचे अभिनंदन होत आहे.



