धरणे सत्याग्रह आंदोलनच्या मागण्या त्वरीत पूर्ण करा-अशोक सब्बन,भारतीय जनसंसद

मावळ मराठा न्युज नेटवर्क -गडचिरोली जिल्ह्यतील सुरजगड लोहखनिज कंपनीकडून होणारी पर्यावरणाची हानी रोखणे,भूमिपुत्रानाच कंपनीच्या नोकरीत समावेश करावा,आदिवासी क्षेत्रासाठी असलेल्या पेसा कायद्याची अंमलबजावणी सक्त करावी शाश्वत विकासाचे जागतिक संघटनेने दिलेले १७ गोल व ९ थीमच्या अंतर्गत शाश्वत विकासाची भूमिका राबवावी या मागण्यासाठी भारतीय जनसंसदेने लाक्षणीक सत्याग्रह केले या सत्याग्रहात राष्ट्रीय मानवाधिकार संघटना,पेसा ग्रामसभा,आरपीआय संघटना,शेतकरी संरक्षण समिती,व विविध सामाजिक संघटनेने सक्रीय सहभाग नोंदवला. गडचिरोली येथील इंदिरा गांधी मुख्य चौकात सत्याग्रह धरने आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व अशोकजी सब्बन राज्य अध्यक्ष भारतीय जनसंसद, राज्य सरचिटणीस, प्रभाकर कोंढाळकर पुणे, आनंद सकट मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणयजी खुणे, अविनाश आंबेकर राज्य विश्वस्त भारतीय जनसंसद, विजय खरवडे गडचिरोली जिल्हाध्यक्ष लोक आंदोलन न्यास तथा भारतीय जनसंसद, बाळकृष्ण सावसाकडे जेष्ट समाजसेवक, मुनेश्वरजी बोरकर आरपीआय तथा सामाजिक कार्यकर्ते, महेश पुलुरवार अध्यक्ष एटापल्ली व्यापारी संघटना, विठ्ठलराव बदखल राज्य अध्यक्ष शेतकरी संरक्षण समिती, धनपाल कार विदर्भ प्रमुख अखील भारतीय कलावंत संघटना,भरतजी खटी राज्य उपाध्यक्ष मानवाधिकार संघटना, त्र्यंबक भजणे सामाजिक कार्यकर्ते, पुंडलिक नागपुरकर , सोमेश्वर नाकाडे, रामकृष्ण धोटे, रविंद्र दोनाडकर,भास्करजी इंगळे, प्रमिला फरकाडे,निर्मला उपलेंचवार,संगीता हर्षे,व अन्य सामाजिक कार्यकर्त्यानी केले.या आंदोलनातील मागण्या लोहखनिज वाहतूकीतील अनेक रस्ते खराब झाले व त्या खराब रस्त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला.सदर प्रकर्णी कंपनीला दोषी ठरवून त्यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावे. व कंपनी कडून दर्जेदार व मजबूत पक्के रस्ते तयार होईपर्यंत लोहखनिज वाहतूक तात्काळ बंद करावे.सदर सुरजागड लोहखनिज परीसर संपूर्ण पेसा क्षेत्र असुन परीसरात पेसा ग्रामसभांची मंजुरी घेण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.तेव्हा परीसरातील एकुण पेसा ग्रामसभांची बैठक घेऊन त्यांनी परवानगी दिल्या शिवाय यापुढील लोह खनिज उत्खनन करु नये.लोहखनिजाच्या लालसर धुळीमुळे व दुषीत पाण्यामुळे प्रदुषणात वाढ झाली ज्यामुळे माणवी जिवन,वने, वन्यजीव, पशुपक्षी,शेतीवर फार मोठ्या परिणाम होत असुन लोहखनिजाची रोज रोज उडणारी धुळ व लोहखनिजाचे लालसर दुषीत पाणी पिल्याने येत्या वर्षभरात सुरजागड लोहखनिज परीसरातील अधिकाधिक लहान मुलांना नागरीकांना व पशुपक्षीना गंभीर आजाराजी लागन होण्याची दाट शक्यता असून ज्यात परीणामी मृत्यूचा धोका संभवतो. कंपनीने गडचिरोली जिल्ह्यातील भूमिपुत्रांशी केलेल्या करारानुसार किती बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले आहे.याची तपासणी करून जिल्ह्यातील किमान २० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे.महत्वाचे शासनाने लोहखनिज उत्खनना करीता कंपनीला जी जागा दिली व त्यातील जेवढ्या झाडांची कत्तल केली त्या बदल्यात कंपनीने ज्या ठिकाणी जागा घेऊन दिली व तिथे लावण्यात आलेल्या झाडांची तपासणी आमच्या समक्ष करण्यात यावे.कंपनीने जी झाडे तोडली ती तोडलेली झाडे नेमकी कोणकोणती होती प्रत्येक झाडांची अंदाजीत रक्कम किती होती.प्रत्येक झाड किती आक्सीजन देणारे होते.व त्या तोडलेल्या झाडांची व्हिलेवाट कुठं लावली याची शासनाने आमच्या समक्ष मोका सखोल चौकशी करावी.यासह अन्य मागण्या संदर्भात शासन, प्रशासनास अनेक लिखीत निवेदन सादर केले परंतु सदर निवेदनावर साधी चौकशी झालेली नाही. शासन,प्रशासनाचे जनतेच्या रास्त मागण्या कडे लक्ष वेधण्या करीता गडचिरोली येथील इंदिरा गांधी मुख्य चौकात सत्याग्रह धरने आंदोलन केले. सदर आंदोलनाची शासन, प्रशासने दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक त्रिव्र केले जाणार असल्याचे सांगितले.या आंदोलनात शेकडो महीला व पुरुष सहभागी झाले.सदर आंदोलन कर्त्यानी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांचे मार्फत रास्त मागण्यांची पूर्तता तात्काळ करावी या करीता राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, वनमंत्री, पर्यावरण मंत्री व संबंधित सचिवांना निवेदन सादर केले.आंदोलनाची सुरवात महात्मा गांधींच्या, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन दिपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. विशाखा शरणे यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page