ओवळे गावातील श्री म्हसोबावाडी तील गौरी-गणपतींचे मोठ्या उत्साहात,भक्तिमय वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन








मावळ मराठा न्युज-ओवळे गावातील श्री.म्हसोबावाडीतील गौरी-गणपतींचे मोठ्या उत्साहात,भक्तिमय वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात तसेच गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या.असा जयघोष करत विसर्जन करण्यात आले.गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशाच्या गजरात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे आर्जव करीत ओवळेरांनी गणेशाला निरोप दिला. गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी विसर्जनस्थळाच्या दिशेने गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आली होती. ढोल-ताशाचा गजर, फटाक्यांची आतशबाजी आणि गणेश नामाचा जप करीत भाविक या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते.पावसातही गणेशभक्तांचा उत्साह कायम होता. गणरायांच्या दर्शनासाठी गावातील अनेक लोक आले होते. बहुसंख्य नागरिक गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आले होते.यावेळी ओवळे गावातील अनेक ग्रामस्थ,महिला,पुरुष,तरूण/तरूणी,लहान मुले/मुली उपस्थित होते.



