नांगरगाव-भांगरवाडी नियोजित उड्डाणपुलाच्या पोच रस्ता कधी होणार? – श्रीधर पुजारी

मावळ मराठा न्यूज :- लोणावळा, नांगरगाव-भांगरवाडी नियोजित उड्डाणपुलाच्या पोच रस्ता कधी होणार ?असा सवाल माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी मावळ मराठा न्यूज शी बोलताना केला आहे. यासाठी लोणावळा नगरपरिषदेने कोट्यावधी रुपये सदर जागा खरेदी करून मोबदला एक वर्षा पूर्वीच दिला असताना तेथील रस्ता करण्यात काय अडचण आहे असे ही पुजारी यांनी म्हंटले आहे. लोणावळा नगर परिषदेने जर साडे तीन कोटी सदर जागेचा मोबदला दिला असताना रस्ता करण्यात पालिकेला काय अडचण आहे. जर सदर रस्ता लोणावळा नगरपरिषदेने केला तर भांगरवाडी तील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल.पावसाळ्यापूर्वी सदर काम पूर्ण करण्यात यावे असे ही लोणावळा नगरपरिषदेला दिलेल्या १३ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात पुजारी यांनी नमूद केले आहे. भांगरवाडीचा मुख्यरस्ता हा नेहमी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पालिकेने सदर पोच रस्त्याचे काम केल्यास मुख्य रस्त्यावरील ताण कमी होइल. पालिकेला वारंवार तोंडी, लेखी सांगून देखील रस्ता का करत नाही असा सवाल पुजारी यांनी केला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page