जिप व पं.समिती,मावळ,शिक्षण विभाग यशवंतराव चव्हाण कला,क्रीडा,सांस्कृतिक महोत्सव २०२५-२६ केंद्र स्तरीय स्पर्धा माजी विद्यार्थी स्नेहा मेळावा

मावळ मराठा न्युज – मावळ,दिनांक २४/११/२०२५ रोजी आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडळ व शालेय व्यवस्थापन समिती मुंढावरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये मुंढावरे, वळक, सांगिसे,बुधवडी, वेल्हवळी, खांडशी,नेसावे,उंबरवाडी,वाडीवळे इ. शाळा सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये संस्कृतीक नृत्य वैयक्तिक गायन,भजन,कबड्डी,खो-खो कविता गायन,प्रश्नमंजुषा बेडूकउडी,लांबउडी,उंचउडी, धावणे, लिंबू चमच्या, स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंढावरे गावचे सरपंच सौ राणीताई सनी जाधव होत्या. प्रमुख पाहुणे मा.जि.प.सदस्या कुसुमताई काशीकर,निलेश अवसरमोल मंडलाधिकारी टाकवे खुर्द,राम बाचेवाड ग्राममहसुल अधिकारी, केंद्रप्रमुख शशिकांत वायाळ,सुहास धस,उपसरपंच स्वप्नाजा थोरात,पो. पाटील नम्रता थोरात,सनी जाधव,गणेश चव्हाण, सचिन गरुड,योगेश चव्हाण, संदीप जाधव ,कविता बांगर ,सागर रणपिसे अमोल थोरवे ,आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.सर्व विजेता विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली सर्व शाळेच्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दिपक गायकवाड उपाध्यक्ष दत्ता कदम, रोहिदास वाघमारे, अमोल थोरात शाळेचे मुख्याध्यापिका हेमलता मोरे शिक्षिका हेमलता गायकवाड यांनी केले व आभार दिपक गायकवाड यांनी मानले. प्रशासनामार्फत व सांगिसे केंद्रामार्फत नियोजक व आयोजक मुंढावरे यांचे कौतुक करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page