गुणवंत शिक्षिका तृप्ती निकम जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित






मावळ मराठा न्युज -लोणावळा : लोणावळा येथील गुरुकुल विद्यालयातील कार्यरत शिक्षिका तृप्ती निकम यांना खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर संघाच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार सोहळा ७ सप्टेंबर रोजी राजगुरुनगर येथे पार पडलातृप्ती निकम यांच्याबरोबरच मावळ तालुक्यातील संत ज्ञानेश्वर विद्यामंदीर, दिवड येथील मुख्याध्यापक शशिकांत जाधव,न्यू इंग्लीश स्कूल,वडगाव मावळ येथील शिक्षिका जयश्री बोरसे, वरसुबाई माध्यमिक विद्यालय, माळेगाव येथील शिक्षक राजेंद्र भांड तसेच आदर्श विद्यामंदीर तळेगाव दाभाडे येथील शिक्षक श्रीहरी तनपुरे आणि संभाजी ठाकूर यांना देखील जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.कार्यक्रमप्रसंगी पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे, शिक्षणाधिकारी (माध्य) डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी (प्राथ) संजय नाईकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊनच पुरस्कार दिल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथ) श्री नाईकडे यांनी सांगितले. प्रस्ताविक खेड तालुका माध्य. मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर संघाचे सचिव तथा जिल्हास्तरीय क्रिडापरिषद पुरस्कार विजेते रामदास रेटवडे यांनी तर आभार कार्याध्यक्ष उत्तमराव पोटवडे यांनी मानले.



