पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांना निरोप म्हणून फन फेअर फीस्ट चे आयोजन


मावळ मराठा न्युज:- पिंपरी, पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूल मध्ये शैक्षणिक सरत्या वर्षाच्या शेवटी मुलांना आनंद आणि मुलांना व्यवसाय आणि व्यवहारिक ज्ञान मिळवण्याच्या दृष्टिकोनातून शाळेमध्ये फनफेअर फिस्टचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष श्री. अनंत काळे सर यांच्या हस्ते द्विप प्रज्वलन करून झाले. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा या कार्यक्रमांमध्ये विशेष सहभाग दिसून आला.तसेच ॲड.सचिन अनंत काळे,नगरसेवक आळंदी नगरपरिषद यांना भारत सरकारच्या नोटरी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये खाद्यपदार्थाची दुकाने, स्टेशनरी साहित्य,अलंकाराचे साहित्य ,शैक्षणिक साहित्य इत्यादी दुकाने थाटली होती. मुलांचे मनोरंजन करण्यासाठी जादूचे प्रयोग, व विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या खेळाचा मनमुराद आनंद घेतला. संस्थेचे संचालक श्री.नवनाथ काळे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य व व्यवहारीक ज्ञान अशा कार्यक्रमामधूनच आम्ही रुजवलीत असतो असे त्यांनी मत व्यक्त केले. संस्थेचे संचालक ॲड .सचिन काळे यांनी विद्यार्थ्यांच्या दुकानाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे बोलण्याचे कौशल्य व व्यवहारिक ज्ञान जाणून घेतले आणि हे माहिती घेताना त्यांना विशेष आनंद होत होता.सौ. कुंदा काळे यांनी विद्यार्थ्यांनी थाटलेल्या दुकानांमधून खाण्याच्या पदार्थाचा मनमुराद आस्वाद घेतला. आणि मुलांचे भरभरून कौतुक केले.सौ. स्वाती काळे मुख्याध्यापिका किड्स पॅराडाईज स्कूल यांची सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती होती. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री संदीप काळे,यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्साह तसेच शाळेने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाची रूपरेखा व कार्यक्रमाचे आयोजन सौ. प्रज्ञा काळे मुख्याध्यापिका पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शारीरिक शिक्षक संदेश साकोरे ,प्रशांत हराळ,अभिषेक हजारंगे, प्रणव साकुंदे यांनी परीश्रम घेतले तर नियोजन सपना शिंपी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री काटे व मुख्याध्यापिका सौ प्रज्ञा काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहशिक्षिका जिजाबाई कल्याणकर व आशा थोरात, वैशाली येडे,प्रियंका वाघ यांचे सहकार्य लाभलेला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी व पालकांनी संगीताचा मनमुराद आनंद लुटून नृत्य सादर केले. व वर्षातून एकदा अशा कार्यक्रमाचे आयोजन व्हावे अशी इच्छा पालकांनी व्यक्त केली.




