सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान

मावळ मराठा न्युज :-पिंपरी – प्रतिनिधी, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सर्व प्रथम आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे व साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार श्री बब्रूवान साळवे यांच्या वतीने अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी माजी अध्यक्षा आशाताई शहाणे, केशरताई लांडगे, डॉ आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्षा सविता ताई आव्हाड तसेच आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व अध्यक्षा भारतीताई चांदणे, व पुजाताई यांचा सकल मातंग समाजाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्या आला‌.दरम्यान सकल मातंग समाज पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांच्या वतीने चहा व नाष्ट्याची सोय करण्यात आली.यावेळी डॉ आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष आण्णासाहेब कसबे, सकल मातंग समाज समन्वयक प्रमुख डी पी खंडाळे, पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, प्रदेश समन्वयक प्रमुख लोकसेवक युवराज दाखले, रामदास कांबळे, गणेश कलवले, जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे,अनिल तांबे,मंगेश डाखोरे, पैलवान विठ्ठल शिंदे,केशर ताई लांडगे, अशाताई शहाणे, सविताताई आव्हाड, भारतीताई चांदणे, मंगलताई रूपटक्के, मिराताई अल्लाट आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page