ऑक्सिलियम शाळेच्या ग्रीन क्लबच्या ५० विद्यार्थिनी कडून प्लास्टिक हटाव पर्यावरण बचावचा नारा



मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा नगरपरिषद येथे आज ऑक्सिलियम शाळेच्या ग्रीन क्लबच्या ५० विद्यार्थिनी कडून प्लास्टिक हटाव पर्यावरण बचावचा नारा देण्यात आला.यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शरद कुळकर्णी विजय लोणकर जितेंद्र राऊत, कर्मचारी,शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी सुंदर लोणावळा, स्वच्छ लोणावळा,तसेच प्लास्टिक हटाव पर्यावरण बचावचा घोषणा देत पर्यावरण विषयक जन जागृती करण्यात आली यावेळी प्रिंसिपल सिस्टर शिनी अलफोन्स,टीचर सिस्टर जुडी गायकवाड,अस्मा निंबर्गी,युनिता पटराव,सीमा खान,माजी विद्यार्थिनी ईश्वरी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.




