भारतीय जनता पार्टी,लोणावळा नाणे मावळ यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविका यांच्या सन्मान








मावळ मराठा न्युज – लोणावळा,भारतीय जनता पार्टी,लोणावळा नाणे मावळ यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवड्यात लोणावळा शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन अनिल गायकवाड,अध्यक्ष,लोणावळा नाणे मावळ, राजाभाऊ खळदकर सरचिटणीस,लोणावळा नाणे मावळ, परिजा भिलारे,अध्यक्ष,भाजपा,युवा महिला आघाडी मोर्चा,ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा मृदुला पाटील,सह खजिनदार संध्या गव्हाणे,सुनीता अनिल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.अंगणवाडी सेविकांनी स्वागत गीत गायले.
प्रास्ताविक राजाभाऊ खळदकर यांनी सादर केले,या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परिजा भिलारे यांनी भूषवले.पाहुण्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.लोणावळा परिसरातील ३० अंगणवाडी सेविका यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आले. यावेळी ३० मदतनीस यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाचे कारके वंदना,शाहीन आरकाटी,निलीमा देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, सर्व अंगणवाडी सेविका यां सन्मानाने भारावून गेल्या होत्या. अनिल गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार भाजपा शिक्षक आघाडी अध्यक्ष रश्मी शिरसकर यांनी केले.या कार्यक्रमात लोणावळा परिसरातील महिला आघाडी आणि अंगणवाडी सेविका मदतनीस,काही मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी गौरी गायकवाड आणि मुकुंद घनवट यांचे सहकार्य लाभले.



