माहिती अधिकार कार्यकर्ता सुनील गुजर यांचे विरोधात आमदार सुनील शेळके यांची बंडगार्डन पोलीस स्टेशनला तक्रार; चोराच्या उलट्या बोंबा- सुनील गुजर






मावळ मराठा न्युज – ग्रामीण भागातील एका साध्या,सरळ माहिती अधिकार कार्यकर्ता सुनील गुजरवर आमदार सुनील शेळके आणि त्यांचे १५,२० कार्यकर्ते अंगावर धावून गेले,गुजर यांना धमकावले,बॅग हिसकावून घेतली आणि उलट मावळचे आमदार सुनील शेळके यांनीच सुनील गुजर यांचेविरोधात सुरक्षेचा मुद्द्यावर हात घालत पाळत ठेवत असल्याची तक्रार बंड गार्डन पोलीस स्टेशनला केली.यात आमचे मित्र माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील गुजर यांचेशी संपर्क केला असता,मला आमदार सुनील शेळके यांच्या समक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्का बुक्की करत त्यांना कोणताही अधिकार नसताना माझे जवळील बॅग हिसकावून घेतली.माहिती घेऊन वरचा मजल्यावर जात असतांना आमदार सुनील शेळके यांनी बोलावून त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत मला धक्काबुक्की केल्याचे गुजर यांनी मावळ मराठा न्यूजशी बोलतांना सांगितले. यात टाटा कंपनीचा कंत्राक्ट त्यांचा कार्यकर्त्याला दिले आहे. त्याची माहिती मी घेतली असल्याने त्याचा राग म्हणून माझेविरोधात खोटी तक्रार दिल्याचे सुनील गुजर यांनी सांगितले. या विरोधात मी जिल्हाधिकारी कार्यालयातील सिसी टीव्ही पूटेज घेणार असल्याचे ही यावेळी मावळ मराठा न्यूज शी बोलताना सांगितले.माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील गुजर हे एक सच्चे आणि प्रामाणिक माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत,अनेक गरीब,गरजू शेतकरी यांना त्यांनी आतापर्यंत न्याय मिळवून द्यायचे काम त्यांनी केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके यांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप करत दोन्ही मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली आहे. या घटनेवरून एखाद्या प्रामाणिक आणि सरळ माहिती अधिकार कार्यकर्ताने माहिती काढली म्हणून त्याला ब्लॅक मेलर म्हणणं किती योग्य आहे असा प्रश्न निर्माण होतो. मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी त्यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. आमदार सुनील शेळके यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या लेखी तक्रारीत श्री. सुनील रघुनाथ गुजर (रा. पिंपळोली, ता. मावळ, जि. पुणे) यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. संबंधित व्यक्तीने स्वतःला माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सांगून महाराष्ट्र शासनाचे खोटे अथवा बोगस ओळखपत्र वापरल्याचा तसेच नागरिकांना नाहक त्रास देऊन धमकावून पैशांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.आमदार सुनील शेळके यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी आमदार सुनील शेळके हे आपल्या मतदारसंघातील शासकीय कामकाजासाठी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता, सुनीलगुजर यांनी आमदार यांची वैयक्तिक, संवेदनशील व्यावसायिक तसेच खासगी माहितीबाबत इतर व्यक्तींच्या नावाने अर्ज करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, गुजर यांच्या कडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन आढळल्याचेही तक्रारीत सुनील शेळके यांनी नमूद केले आहे. सुनील गुजर अनेक दिवसांपासून आमदारांच्या कार्यालयात तसेच नियोजित कार्यक्रमांच्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता म्हणून येऊन त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याची माहिती यापूर्वी मिळाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच आमदारांची माहिती राजकीय विरोधकांसह गुन्हेगारांपर्यंत पोहोचवली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने रामदास काकडे यांच्या सांगण्यावरून संबंधित व्यक्ती हे सर्व करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.परंतु याबाबत सुनील गुजर यांचेशी संपर्क केला असता आमदार धादान्त खोटे बोलत असल्याचे गुजर यांनी मावळ मराठा न्यूजशी बोलताना सांगितले.आमदार सुनील शेळके यांनी संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी करावी, त्याच्या दोन्ही मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड तपासावेत आणि या प्रकरणात तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बंड गार्डन पोलिसांकडे केली आहे.



