कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना त्वरित मदत करा आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीकरत मावळ तालुका महाविकास आघाडीचे तहसीलदार यांना निवेदन

मावळ मराठा न्युजवडगांव मावळ,ह्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्रात पडलेला कोरडा दुष्काळ, शेतकऱ्यांवर आलेल्या ह्या आकस्मिक अस्मानी संकटामुळे, शेतातील पिके करपून गेली आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अतोनात नुकसान झालेले आहे. शासनाने पिकांचे त्वरीत पंचनामे करून, कुठलेही आढेवेढे न घेता तात्काळ शेतकऱ्यांना भरगोस मदत करावी व कोरडा दुष्काळ जाहीर करावा.तसेच वोटचोरी करुन सत्ताधाऱ्यांना वारंवार जिकून देणारे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री.ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणी साठी व त्यांच्या निषेधार्थ ” मावळ तालुका महाविकास आघाडीच्या “वतीने आज वडगाव मावळ येथे मावळचे तहसीलदार मा.श्री.विक्रमजी देशमुख साहेब यांना निवेदन देण्यात आले.यावेळी पुणे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, महिला आघाडी सह संपर्क संघटिका शहादान चौधरी,उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर,जिल्हा संघटिका शैलाताई खंडागळे, तालुका प्रमुख आशिष ठोंबरे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दत्ता पडवळ, काँग्रेस तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, तालुका समन्वयक शांताराम भोते,सल्लगार प्रमुख मारुती खोले,शहरप्रमुख संदीप बालघरे, राहुल नखाते,कामशेत शहरप्रमुख ज्ञानदेव कदम, वडगाव शहरप्रमुख राहुल नखाते, बाळासाहेब शिंदे,मा. शहरप्रमुख परेश बडेकर,युवासेना तालुका अधिकारी उमेश गावडे,युवराज सुतार,तालुका संघटक काळु हुलावळे,चोरगे भाऊ,महिला आघाडी उप शहर संघटिका प्रतिभा कालेकर,लोणावळा शहर प्रसिद्धी प्रमुख धीरज घारे,विभागप्रमुख सुरेश गुप्ता,महाविकास आघाडीचे सर्व आजी माजी प्रमुख पदाधिकारी,महिला आघाडी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वोटचोरी संधर्भात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली व मावळ तालुक्यातील पावसा अभावी शेतकऱ्यांच्या भात पिकांचे झालेल्या पिकांचे नुकसान दुष्काळ जाहीर करावा व त्यांना त्वरित मदत मिळावी अशी मुख्य मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार विक्रमजी देशमुख यानी असे आश्वासन दिले कि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून त्वरित दुष्काळ जाहीर करू असे अशस्वासन दिले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page