बालमोहन विद्यालयाची ५३ वर्षाची उज्वल परंपरा असणाऱ्या आषाढी वारीचा सांगता समारंभ विठ्ठल मंदिरात संपन्न



मावळ मराठा न्यूज़ :-गुरुवार दिनांक २९ जून २०२३ संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने आनंदाने साजरा केला जाणारा आषाढी एकादशीचा पवित्र दिवस. ५३ वर्षाची उज्वल परंपरा असलेल्या बालमोहनचे आजी माजी विद्यार्थी सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील उपस्थित होते. ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका विराजमान असलेली पालखी विविध भरजरी वस्त्र आणि फुलांनी सजवली गेली. महाराष्ट्राच आराध्य दैवत असलेल्या विठोबा रखुमाईच्या रूपातील दैवत वस्त्रालंकर आणि फुलांनी सजवलेल्या रथावर विराजमान झाले होते. टाळ मृदुंग- विविध ओव्या अभंगांच्या जल्लोषात ही वारी दहा वाजता बालमोहनच्या प्रांगणातून निघून मजल दलमजल करीत अकरा साडेअकराच्या दरम्यान जगद्गुरु संत तुकारामांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या विठ्ठल मंदिराच्या सभागृहात येऊन आली. पालखीच्या मार्गातील स्टेशन चौक-नगरपालिका- जिजामाता आणि शाळाचौक या विविध चौकात भाविकांनी पालखीच दर्शन घेताना विद्यार्थ्यांना फलाहाराचा प्रसादही दिलासभागृहातील उपस्थितांचे मुख्याध्यापिका प्रतिभा चौधरी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध अभंग आणि भक्ती गीतातून संपूर्ण सभागृह भक्तीरसात चिंब चिंब भिजून गेलं.आम्ही जातो माघारी या भक्तीगीताच्या श्रवणातून भक्त अनुभवत असलेल्या पांडुरंगाच्या विरहाची आर्तता प्रत्येकाच्या अंतकरणाला भिडत होती. विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष श्री माऊली दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना मंदिराचा जाज्वल्य इतिहास सांगून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित लायन अध्यक्ष अनिकेत काळोखे यांनी लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा! या जगद्गुरु संत तुकारामाच्या अभंगाचा आधार घेत विद्यार्थ्यांना संबोधित केले. विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर दिपाली भंडारी झवर यांनी या विद्यालयाने याच संस्कारातून आम्हाला घडवले आहे म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत . लौकिक अर्थाने आपण कितीही मोठे झालो तरी जमिनीच भान ठेवून आपण सतत क्रियाशील रहावे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. त्यानंतर जेष्ठ लायन डॉक्टर शालिग्राम भंडारींनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपण विविध क्षेत्रात एका विलक्षण उंचीवर जेव्हा जाल तेव्हा,आपला सक्षम हात एखाद्याच्या खांद्यावर ठेवून त्याच्या जीवनात आनंदाचा मळा फुलवण्याचं सत्कर्म करीत रहा. हाच संकल्प आपण या आषाढी एकादशी निमित्त सोडू या कारण,संतांची शिकवण अशीच आहे की,जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले. तोचि साधू ओळखावा- देव तेथेची जाणावा.यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तीत विठ्ठलाचे दर्शन घेतले लायन जगदीश झोमटे आणि विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या सौजन्याने उपस्थितांना चविष्ट साबुदाणा खिचडी, उपवासाचा लाडू आणि सफरचंदाचा महाप्रसाद देण्यात आला. या प्रसन्न पवित्र समारंभास खालील लायन उपस्थित होते. अध्यक्ष(२०२२ -२३ ) लायन मयूर राजगुरव,अध्यक्ष(२०२३ -२४ ) लायन अनिकेत काळोखे, ला. महेशभाई शहा, ला. नंदकुमार काळोखे, ला. डॉ. शाळीग्राम भंडारी, ला. मनोहर दाभाडे, ला भरत पोद्दार, ला यशवंत पाटील, ला शेखर चौधरी, ला राधेश्याम भंडारी, ला दिपक बाळसराफ, ला निलेश जैन,ला यतीन शहा, ला प्रकाश पटेल, ला संध्या काळोखे ,ला राजश्री शहा, ला प्रमिला वाळुंज, ला अनिता बाळसराफ, ला अक्षता राजगुरव, ला प्रियांका काळोखे.या अत्यंत देखण्या समारंभाचे उत्तम आयोजन नियोजन आणि संयोजन विद्यालयाच्या खाली निर्देश केलेल्या आदरणीय शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलेत.आषाढी एकादशी दिंडीच्या कार्यक्रमा चे निवेदन सौ सुनिता दांगट व श्री संकेत पोंगशे यांनी केले. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रतिभा चौधरी यांनी केले .अभंगासाठी विशेष परिश्रम श्री संजीव जाधव, श्री शरद इसकांडे व सौ पूजा देव यांनी घेतले. आभार प्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक श्री सुभाष ठाणगे यांनी मानले.




